top of page

desk of abhijeet rane

dhadakkamgarunion0

*ABHIJEET RANE (AR)*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडानंतर खासदारही उध्दव ठाकरेंची साथ सोडण्याच्या बेतात असल्याने शिवसैनिकही मातोश्रीने मुख्यमंत्री शिंदेंची जुळवून घ्यायला हवे असे मत व्यक्त करत मातोश्रीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी हीच ती वेळ असाही सल्ला ते देतांत.


*ABHIJEET RANE (AR)*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून सुरू झालेल्या बंडखोरीने आता निर्वाणीचे रूप धारण केलयं.एकनाथ अडसूळ व रामदास कदम ह्या बड्या नेत्यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.त्यामुळे दिवसेंदिवस उध्दव ठाकरेंची मूळ शिवसेना क्षीण होत चालली आहे.

*ABHIJEET RANE (AR)*

पूरपरिस्थितीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवस साजरा करणार नाहीत. नेते, कार्यकर्त्यांनाही हौ़र्डिंग्ज, बॅनरबाजी करायला त्यांनी मनाई केली आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या मनाला त्यांचा विचार भावला व फडणवीसांबद्दल त्यांचा ऊर भरून आला.

 

*ABHIJEET RANE (AR)*

मविआ सरकारात कोणालाही वेळेवर मदतीसाठी न पोचणाऱ्या आदित्य ठाकरेंनी धारवाडमधील एसटी अपघातानंतर मदत करण्याची भाषा केली तेव्हा विधानभवन परिसरांत त्यांची खिल्ली उडवली गेली. आजोबांची शिवसेना टिकवली तरी पुष्कळ अशी कुजबुज तिथे होती.


*ABHIJEET RANE (AR)*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसेना सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडताच राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्रात त्याचा ढोल पिटला. शिंदेंसेना सरकारची बदनामी करत.खंडाळा ते कोल्हापूरपर्यंतचा भाग पिंजला. त्यामुळे जो तो एकच प्रश्न विचारतोय, शिंदें सरकार टिकेल ना?

*ABHIJEET RANE (AR)*

शिवसेनेतील बंडखोर आमदारांना सर्व्वोच्च न्यायालय अपात्र ठरवेल या दिवास्वप्नात शिवसेना नेते आहेत. प्रत्यक्षांत तिसराच निकालं बाहेर येईल.शिंदेंना तुर्तास दिलासा जाईल व आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभाध्यक्षांकडे जाईल.

 
 
 

Bình luận


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page