सुदृढ आरोग्य राखण्यासाठी करूया योग... पळवूया शरीरातील सर्व रोग..!
सुदृढ आरोग्य राखण्यासाठी करूया योग... पळवूया शरीरातील सर्व रोग..!
आज २१ जून, 'आंतरराष्ट्रीय योग दिन' निमित्त भारतीय जनता पार्टी, उत्तर पश्चिम जिल्हा - आरे मंडळ (जोगेश्वरी पूर्व विधानसभा) च्या वतीने एका विशेष योग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम आरे मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री. महेंद्र झगडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि वनराई उत्कर्ष समाज मंदिर संस्था, गोरेगाव (पूर्व) यांच्या अमूल्य सहकार्याने अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा मुंबई कामगार आघाडीचे अध्यक्ष तथा धडक कामगार युनियनचे संस्थापक आदरणीय श्री. अभिजितजी राणे यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
सकाळी ७ ते ८ या वेळेत झालेल्या या शिबिरात परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन योगासनांचा सराव केला आणि निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून जागतिक स्तरावर पोहोचलेल्या या योग साधनेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे हाच या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व योगप्रेमींचे, संस्थांचे आणि भाजप कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!
#InternationalYogaDay #YogaDay2026 #BJPMaharashtra #AbhijitRane #AareyMandal #JogeshwariEast #MahendraZhagade #HealthyIndia #YogaForLife #BJP










Comments