सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांतील त्रुटींवर अभिजीत राणेंची महत्त्वपूर्ण भेट
मुंबईतील पर्यावरण संरक्षण आणि सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांतील अनियमितता या महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष व कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा ज्येष्ठ नेते माजी खासदार गोपाळ शेट्टी, भाजपा कोकण आघाडी मुंबईचे अध्यक्ष सुहास आडिवलेकर यांच्या समवेत मुंबई महापालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी पश्चिम उपनगर विभाग-४ मधील निविदा क्रमांक W-414 अंतर्गत मे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडमार्फत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांतील कथित गंभीर त्रुटी, संशयास्पद प्रमाणपत्रे, निविदा प्रक्रियेतील अनियमितता आणि महापालिका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. या प्रकरणात धडक कामगार युनियनने केलेल्या पाठपुराव्याची माहिती देत तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी अभिजीत राणे यांनी गणेश खणकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. व या विषयांवर ठोस कार्यवाही व्हावी, ही अपेक्षा व्यक्त केली.
#अभिजीतराणे #गणेशखणकर #भाजपाकामगारआघाडी #AR #photo Ganesh Khankar Devendra Fadnavis CMOMaharashtra BJP Maharashtra BJP Mumbai Devendra Fadnavis for Maharashtra Ameet Satam Ravindra Chavan Bharatiya Janata Party (BJP) Vinod Shelar BJP Narendra Modi Nitin Nabin Kripashankar Singh Sunil Rane Murji Patel Parag Shah Asian News International (ANI) Pravin Darekar - प्रविण दरेकर Prasad Lad MyBmc








Comments