संत निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत गोरेगाव–मालाडमध्ये भव्य स्वच्छता अभियान; कामगार नेते अभिजीत राणे यांचा सक्रिय सहभाग
dhadakkamgarunion0
Feb 23
1 min read
संत निरंकारी मिशनच्या ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत गोरेगाव–मालाड परिसरात राबविण्यात आलेल्या भव्य स्वच्छता अभियानात धडक कामगार युनियन चे संस्तापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सक्रिय सहभाग घेत मानवसेवेचा आदर्श घालून दिला. आरे तलाव व वनराई पोलिस स्टेशन येथे पार पडलेल्या या उपक्रमात हजारो सेवादल व निरंकारी भक्तांनी जलसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला. परम श्रद्धेय सुधिक्षा माता यांच्या पावन मार्गदर्शनाखाली आणि ‘संत निरंकार मिशन’च्या वतीने देशभर एकाच वेळी साकार झालेल्या या अभियानाचे अभिजीत राणे यांनी मनापासून कौतुक केले.














































Comments