शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार
- dhadakkamgarunion0
- 2 days ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार
● महाराष्ट्र राज्याला येणाऱ्या काळात पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारचे आगामी उद्दिष्ट हे बळीराजाला समृद्ध आणि स्वयंपूर्ण करणे असून, त्यासाठी विविध जलसंधारण योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि त्यांना नैसर्गिक संकटांशी लढता यावे, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी पावले उचलली आहेत. 'पुढच्या टप्प्यात दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा सरकारचा ठाम प्रयत्न राहणार आहे', असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी नुकतेच एका जाहीर कार्यक्रमात केले. दुष्काळी भागाला संजीवनी देण्यासाठी नदीजोड प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी वळवून ते तहानलेल्या जमिनीला देण्यासाठी नवीन कालवे आणि जलवाहिन्यांचे जाळे विणले जात आहे. या प्रकल्पांमुळे मराठवाडा आणि विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून निघेल आणि महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments