top of page
Search

वृक्षसंवर्धन आणि रस्ते कामांतील पारदर्शकतेसाठी अभिजीत राणेंची महापौरांशी चर्चा

2 days ago
1 min read

मुंबईतील पर्यावरण संरक्षण आणि सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांतील अनियमितता या महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष व कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

वृक्षतोड व वृक्ष पुनर्रोपणाच्या परवानग्यांमध्ये वृक्ष प्राधिकरणाने घालून दिलेल्या वृक्षलागवडीच्या अटींचे पालन न करणाऱ्यांवर महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ च्या कलम २१ अंतर्गत कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ अनामत रक्कम जप्त करण्याच्या प्रकाराबाबत अभिजीत राणे यांनी लक्ष वेधले.

तसेच पश्चिम उपनगर विभाग-४ मधील निविदा क्रमांक W-414 अंतर्गत मे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडमार्फत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांतील कथित गंभीर त्रुटी, संशयास्पद प्रमाणपत्रे, निविदा प्रक्रियेतील अनियमितता आणि महापालिका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. या प्रकरणात धडक कामगार युनियनने केलेल्या पाठपुराव्याची माहिती देत तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली.

यावेळी अभिजीत राणे यांनी महापौर रितू तावडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. व दोन्ही विषयांवर ठोस कार्यवाही व्हावी, ही अपेक्षा व्यक्त केली.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page