top of page

राज्याच्या विकासाचे सारथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • dhadakkamgarunion0
  • Mar 31
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

राज्याच्या विकासाचे सारथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

● महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धडाकेबाज उत्तरांनी गाजला. सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रत्येक मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी अतिशय बारकाईने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने भाष्य केले. राज्याच्या हिताचे रक्षण करतानाच, विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी पुराव्यासह उत्तरे दिली. फडणवीस यांच्या भाषणात त्यांची प्रशासनावरील पकड आणि राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भर दिला. अर्थसंकल्पात जाहीर केलेली २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ही केवळ घोषणा नसून ती अंमलात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'द्वारे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत कशी पोहोचवली जात आहे, याचा तांत्रिक आराखडाच त्यांनी सभागृहासमोर मांडला. राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उचललेली पावले आणि वाढता विकास दर यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तरे दिली. फडणवीस यांनी 'डिजिटल महाराष्ट्र' आणि 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' यांसारख्या आधुनिक संकल्पनांवर भाष्य केले..

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page