महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत सातही जागांवर बिनविरोध उमेदवार निवडले गेले.
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 2 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत सातही जागांवर बिनविरोध उमेदवार निवडले गेले. भाजपला चार, शिंदे गटाला एक, अजित पवार गटाला एक आणि शरद पवार गटाला एक जागा मिळाली. मात्र सर्वाधिक चर्चेत राहिली ती शिवसेनेच्या आक्रमक नेत्या ज्योती वाघमारे यांची उमेदवारी. अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून एका सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलगडले की, वाघमारे यांना उमेदवारीबाबत पूर्वकल्पना नव्हती; समितीसाठी कागदपत्रे मागवून थेट अर्ज दाखल करण्यात आला. या धक्कातंत्रातून तळागाळातील कार्यकर्त्याला संसदेत पोहोचवण्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. वाघमारे यांच्या आक्रमक शैलीची दखल घेत पक्षाने त्यांना राज्यसभेत पाठवले असून, या निर्णयामुळे नवनेतृत्वाला वाव मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याने केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. राष्ट्रपतींना अपेक्षित स्वागत न मिळणे, मार्गाविषयी योग्य माहिती न देणे आणि व्यवस्थेतील त्रुटी यावर स्पष्टीकरण मागितले गेले आहे. उत्तर बंगाल दौऱ्यात संथाल परिषदेसाठी ठिकाण बदलल्याने अनेकांना सहभागी होता आले नाही, याबाबत राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांची अनुपस्थितीही त्यांनी नोंदवली. राष्ट्रपती पदाच्या सन्मानासाठी प्रोटोकॉलचे पालन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे राज्य प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
बीडमध्ये विजय पवारवर लहान मुलींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत. आंदोलने झाली, क्लासेस बंद झाले, पालकांचा विश्वास डळमळला. तरीही अशा व्यक्तीकडून सत्कार स्वीकारताना मनोज जरांगे दिसतात. हेच जर दुसऱ्या पक्षातील कोणी केले असते तर जरांगे संपूर्ण जात बदनाम करत शिवीगाळ केली असती. मग आपल्या बाजूच्या व्यक्तीबाबत मौन का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा दावा करणाऱ्या नेत्याने अशा गुन्हेगारांपासून दूर राहणे अपेक्षित आहे. अन्यथा नैतिकतेचा पाया कोसळतो. समाजाला न्यायाची अपेक्षा असते, पण राजकारणात सोयीसाठी दुहेरी मापदंड लावले जातात. विजय पवारची स्मायलिंग पोज लोकांच्या मनात तिडीक निर्माण करते, आणि जरांगेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
सध्याच्या संघर्षात इराण समर्थक गट सोशल मीडियावर बसून अवास्तव दावे करत आहेत. ‘‘अमेरिकन युद्धनौका बुडवली’’ किंवा ‘‘मिसाईल बिस्किटासारख्या तयार होतात’’ अशा बातम्या कुठलीही पुष्टी नसताना पसरवल्या जात आहेत. वास्तव मात्र वेगळे आहे—इराणचे एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त झाले असून शहरांवर सतत बॉम्बहल्ले होत आहेत. नौदलाची हानी इतकी मोठी आहे की जहाजे परदेशी बंदरांत लपून बसली आहेत. केवळ मिसाईलच्या जोरावर दीर्घकाळ टिकणे अशक्य आहे. अमेरिकन व इस्रायली फौज थलयुद्ध टाळून समुद्रातून लांब पल्ल्याच्या हल्ल्यांनी इराणला कमकुवत करत आहे. अशा परिस्थितीत इराणची खरी अवस्था गंभीर आहे, पण समर्थक फेक न्यूजने मन बहलवत आहेत. युद्धाचे सत्य आणि प्रचार यातील फरक ओळखणे नागरिकांसाठी अत्यावश्यक ठरते
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर केंद्र सरकारने सुरू केलेल्या HPV लसीकरण मोहिमेवर मोठी चर्चा आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र लसीला उपाय मानते, पण भारतीय संस्कृतीत रोगप्रतिबंधाचे नैसर्गिक मार्ग आहेत. विवाहापूर्वी ब्रह्मचर्य, वयाची परिपक्वता झाल्यावरच विवाह, आणि पती-पत्नीतील एकनिष्ठता हे संस्कार HPV विषाणूचा प्रसार रोखतात. तंबाखू व धूम्रपान टाळणे, योग व प्राणायाम अंगीकारणे यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पाश्चात्य संस्थांच्या वादग्रस्त भूमिकेमुळे लसीवरील विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे भारतीय जीवनशैली, कौटुंबिक मूल्ये आणि संयम यांचा स्वीकार हा अधिक शाश्वत उपाय ठरतो. योग्य संस्कार व आरोग्यदायी जीवनशैलीने लसीची गरजच भासणार नाही, आणि सुदृढ भारताची निर्मिती होईल.
🔽
#MaharashtraPolitics #RajyaSabha #IndianPolitics #WestBengal #PoliticalNews #SocialIssues #IranConflict #Geopolitics #PublicDebate #HealthPolicy








Comments