top of page

'मला विष प्यायची सवय आहे’; मुख्यमंत्री फडणवीसांचे हर्षवर्धन सपकाळ यांना चोख प्रत्युत्तर

  • dhadakkamgarunion0
  • 22 hours ago
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

'मला विष प्यायची सवय आहे’; मुख्यमंत्री फडणवीसांचे हर्षवर्धन सपकाळ यांना चोख प्रत्युत्तर

● काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपली खास शैली वापरली असून, विरोधकांच्या शिव्यांचा आपल्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस म्हणाले की, सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. मात्र, जेव्हा ही टीका खालच्या पातळीवर जाते, तेव्हा ती स्वीकारणे कठीण असते. "तुमच्या शिव्यांचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही, कारण मला नीळकंठाप्रमाणे विष पचवण्याची सवय झाली आहे," असे म्हणत त्यांनी विरोधकांना शांत राहण्याचा इशारा दिला. निवडणुकीच्या प्रचारात केवळ वैयक्तिक टीका न करता विकासाच्या कामांवर बोलावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. काँग्रेसने गेल्या अनेक वर्षांत शहरांच्या विकासासाठी काय केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपने केलेल्या कामांचा पाढा वाचत त्यांनी महापालिका निवडणुकीत मतदारांना विकासाच्या बाजूने कौल देण्याचे आवाहन केले. विरोधकांकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याने ते केवळ वैयक्तिक आरोप करत सुटले आहेत, असेही ते म्हणाले.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page