top of page

मराठीला ‘ज्ञानभाषा’ म्हणून जागतिक स्तरावर नेण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

  • dhadakkamgarunion0
  • Mar 6
  • 1 min read

🔏 [ ⏺️ पंचनामा ]

▪️==================▪️

मराठीला ‘ज्ञानभाषा’ म्हणून जागतिक स्तरावर नेण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

● मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपणे आणि तिचा गोडवा कायम राखणे ही काळाची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मराठी केवळ संवादाची भाषा न राहता ती 'ज्ञानभाषा' म्हणून विकसित व्हायला हवी. महाराष्ट्रातील विविध प्रादेशिक बोलींमधील माधुर्य टिकवून ठेवण्यावर त्यांनी भर दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानाचे स्मरण करताना फडणवीस म्हणाले की, महाराजांनी स्वराज्याच्या कारभारात परकीय शब्दांचा प्रभाव कमी करण्यासाठी 'राज्यव्यवहार कोश' तयार केला. शिवरायांनीच आपल्याला प्रमाण भाषेचे महत्त्व आणि भाषेचे पावित्र्य राखण्याची शिकवण दिली आहे. आजच्या काळातही तीच प्रेरणा घेऊन आपल्याला भाषेचा विकास करायचा आहे. मराठी भाषेला अनेक वर्षांच्या संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 'अभिजात भाषेचा' दर्जा बहाल केला. या निर्णयामुळे मराठीला खऱ्या अर्थाने 'राजाश्रय' मिळाला आहे. हा दर्जा केवळ तांत्रिक नसून, तो मराठीच्या प्राचीन संस्कृतीचा आणि साहित्याचा गौरव आहे. आता या भाषेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 'लोकमान्यता' मिळवून देणे ही आपली जबाबदारी असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page