मराठी माणसाची प्रतिमा हिंसावादी म्हणून समोर आणू नये; मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली भूमिका
- dhadakkamgarunion0
- Aug 4
- 1 min read
[ पंचनामा ]
==================
मराठी माणसाची प्रतिमा हिंसावादी म्हणून समोर आणू नये; मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली भूमिका
● 'मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांचे स्वागत नाही', राज ठाकरेंच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप नोंदवला आाहे. मराठी माणूस फक्त मराठी भाषेसाठी नाही तर देशासाठी लढला आहे. आपण देशाची संस्कृती जपण्यासाठी अनेक लढाया लढलो आहोत. राज ठाकरे आणि निशिकांत दुबे यांच्यातील शाब्दिक वाद हा राजकीय फायदा मिळवण्यासाठी सुरू असल्याचे सांगत, 'हिंसा करणारा माणूस मराठी असू शकत नाही', असे म्हणत फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे आक्षेप घेतला आहे. फडणवीस यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, 'राज्यात कोणासोबतही दुर्व्यवहार होणार नाही. देशाचा कारभार संविधानानुसार चालेल, कोणीही कायदा-सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न करू नये.' त्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे उदाहरण देत सांगितले की, मराठे केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी लढले. त्यामुळे मराठी माणसाची प्रतिमा हिंसावादी म्हणून समोर आणू नये, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments