कांदिवलीत भाजपा कामगार आघाडीचा सामाजिक उपक्रम; हजारो रिक्षाचालक व प्रवाशांना हायड्रेशन किटचे वितरण...
- dhadakkamgarunion0
- 4 days ago
- 1 min read
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई च्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, पीयुष जी गोयल ,आशिष जी शेलार, मंगलप्रभात जी लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत जी साटम, आ.प्रवीण जी दरेकर, आ.अतुल जी भातखळकर, विनोद जी शेलार, आचार्य पवन त्रिपाठी जी, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मुंबईच्या रिक्षा चालक व प्रवाशांना मोफत हायड्रेशन कीटचे वाटप बुधवार 17 जुन 2026 रोजी सकाळी 11 वाजता इन्स्ट्रॉन -2, बिल्डिंग नं -0, अप्पर पोलिस आयुक्त ऑफीस जवळ, सर्कल ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व) येथे करण्यात आले होते, कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती लाभली. यावेळी भाजपा कामगार आघाडीचे पदाधिकारी उपस्थिती होते ज्यामध्ये अभय झा, जिग्ना देसाई,गार्गी पंकज राय, प्रविण बोरानिया, रवी बनसोडे, किरण मोरे, अमित गडा, फरहाद अरोरा, धर्मेश पाल सिंह, अभिजित भोईटे, भारती भेंडे, वाहिद शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन भाजपा पदाधिकारी राजकुमार सरोज यांनी केले.तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन आगडे, सत्यविजय सावंत, मोहन जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.














Comments