top of page

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आरे कॉलनीत उत्साहात साजरी; मान्यवरांची उपस्थिती, संविधान मूल्यांचा संदेश

dhadakkamgarunion0
Apr 15
1 min read

"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा महामंत्र देणारे जागतिक कीर्तीचे विद्वान आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आरे कॉलनीतील युनिट क्रमांक ५ येथे अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार रवींद्र वायकर आणि आमदार बाळा नर, भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे, शिवसेना उबाठाचे नेते अमोल किर्तीकर यांनी उपस्थिती राहून बाबासाहेबांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या मान्यवरांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला आणि जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी लोकशाहीचे रक्षण: लोकशाही अधिक प्रबळ करणे आणि संविधानातील मूल्यांची जोपासना करणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले. युनिट क्रमांक ५ मधील स्थानिक समितीकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page