top of page

भाजपा कामगार आघाडी मुंबईचा जनहित उपक्रम; बोरिवलीत हायड्रेशन कीटचे मोफत वितरण

  • dhadakkamgarunion0
  • 8 minutes ago
  • 1 min read

भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई च्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत जी साटम, आशिषजी शेलार, गोपाळजी शेट्टी, प्रवीणजी दरेकर, आ.मनीषाताई चौधरी, आ. संजय जी उपाध्याय, गणेश जी खणकर, बाळा जी तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मुंबईच्या रिक्षा चालक व प्रवाशांना मोफत हायड्रेशन कीटचे वाटप आज बोरिवली (पू.) रेल्वे स्थानक, स्टॅन्ड क्र. 1, रेल्वे कॉलनी येथे करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती लाभली. यावेळी भाजपा कामगार आघाडीचे पदाधिकारी उपस्थिती होते ज्यामध्ये ॲड नारायण पणीकर, अभय झा, राजकुमार सरोज, जिग्ना देसाई, गुंजन जयस्वाल, फरहाद अरोरा, धर्मेश पाल सिंह, साहेबराव जाधव, नामदेव चव्हाण, अभिजित भोईटे, भारती भेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनिट च्या बोरिवली (पू.) स्टॅन्ड चे पदाधिकारी तुकाराम नाईक, प्रवीण मोहिते, विनोद मोरे, बाबू बन्डवे, देवादिगा, विलास पाटील, सुनील चव्हाण, शैलेश गुप्ता, राजू शिंदे, समाधान गायकवाड, सुशील गुप्ता, राकेश सिंग, रवी सोनावणे, तातु परब यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाचे नियोजन भाजपा पदाधिकारी रवी बनसोडे, किरण मोरे यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन आगडे, सत्यविजय सावंत, मोहन जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page