बालगुन्हेगारीच्या मुळावर घाव घालणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा
- dhadakkamgarunion0
- 23 hours ago
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
बालगुन्हेगारीच्या मुळावर घाव घालणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा
● महाराष्ट्रात लहान मुलांचा गुन्ह्यांमध्ये होणारा वापर आणि वाढती बालगुन्हेगारी या गंभीर समस्येवर गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अत्यंत आक्रमक आणि कडक भूमिका मांडली आहे. राज्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांनी थेट गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, निष्पाप मुलांना गुन्हेगारीच्या गर्तेत ओढणाऱ्या आणि त्यांच्याकडून गुन्हे करवून घेणाऱ्या संघटित टोळ्यांची गय केली जाणार नाही. अशा टोळ्यांवर आता थेट 'संघटित गुन्हेगारी' (मकोका सारख्या) कडक कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. केवळ स्थानिक पातळीवर कारवाई न करता, गुन्हेगारीचे हे जाळेच मोडून काढण्याचा त्यांचा निर्धार आहे. याशिवाय, वाढत्या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत बालगुन्हेगारीचे कायदेशीर वय १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्यात यावे, यासाठी केंद्र सरकारकडे आग्रही मागणी करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या धाडसी आणि दूरगामी भूमिकेमुळे गुन्हेगारांवर जरब बसेल आणि बालकांचे शोषण थांबवून सुरक्षित समाज निर्माण करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)




Comments