बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मुख्यमंत्री फडणवीसांची 'क्लीन अप' मोहीम
- dhadakkamgarunion0
- Mar 6
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मुख्यमंत्री फडणवीसांची 'क्लीन अप' मोहीम
● महाराष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षिततेसमोर मोठे आव्हान उभे करणाऱ्या अवैध बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई हाती घेतली आहे. राज्याच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही विशेष 'क्लीन अप' मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेमुळे छुप्या मार्गाने राहणाऱ्या घुसखोरांचे धाबे दणाणले असून, त्यांना शोधून मायदेशी धाडण्यासाठी प्रशासन आता युद्धपातळीवर काम करत आहे. अवैध घुसखोरांना शोधणे कठीण होत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने एक विशेष एआय आधारित प्रणाली विकसित केली जात आहे. या प्रणालीद्वारे संशयास्पद कागदपत्रे आणि व्यक्तींची ओळख पटवणे अधिक सोपे होणार आहे. विशेषतः बांधकाम क्षेत्र आणि हॉटेल व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांची कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढलेली घुसखोरांची संख्या लक्षात घेता, सरकारने आता 'मोहीम २०२६' अंतर्गत कठोर पावले उचलली आहेत. या मोहिमेचा मुख्य उद्देश राज्यातील स्थानिक नागरिकांचे हक्क सुरक्षित ठेवणे आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालणे हा आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)


Comments