बंगालमध्ये बदलाची चाहूल
- dhadakkamgarunion0
- Feb 15
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
बंगालमध्ये बदलाची चाहूल
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससमोर कठीण आव्हान उभे आहे. पंधरा वर्षांची सत्ता, ॲन्टी-इनकम्बेंसी, आणि मुस्लिम मतदारांमध्ये AIMIM, काँग्रेस व डाव्यांची घुसखोरी यामुळे मोमताबॅनर्जींचा पारंपरिक मतबँक ढासळत आहे. भाजपने २ वरून ७७ जागांपर्यंत झेप घेतली आणि आता मतप्रतिशत वाढवून १४५ जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता राजकीय पंडित मांडत आहेत. CAAमुळे शरणार्थी हिंदूंना नागरिकत्व मिळाले, तर SIRच्या कारवाईमुळे बोगस मतदानावर लगाम बसला आहे. या पार्श्वभूमीवर मोमतादीदींनी काँग्रेस व वामपंथाशी युती केली तरच त्यांना आधार मिळू शकतो. अन्यथा तिरंगी लढतीत त्यांची सत्ता टिकवणे कठीण ठरेल. बंगालमध्ये बदलाची हवा आहे, आणि तिचा परिणाम तामिळनाडूच्या राजकारणावरही उमटू शकतो.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
रोहित पवार – विरोधी राजकारणाचा तरुण चेहरा
महाराष्ट्रात भाजप विरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेस खच्ची झाली, वंचित व एमआयएम मर्यादित वर्तुळात आहेत. अशा वेळी रोहित पवार हा तरुण मराठा चेहरा विरोधी राजकारणात उभा राहण्याची क्षमता दाखवतो. सुप्रिया सुळे यांच्याशी त्याची स्पर्धा स्पष्ट आहे, पण रोहितने स्वतंत्र अस्तित्व राखले तर त्याला व्यापक पाठिंबा मिळू शकतो. त्याचे उद्योजकांशी आर्थिक संबंध, तरुणाईचा उत्साह आणि शरद पवार समर्थक वर्गाचा आधार हे त्याचे बलस्थान आहे. मात्र सोशल मिडिया पुरते राजकारण न करता जमिनीवर संघटना बांधणे ही खरी कसोटी ठरेल. सर्वसमावेशक धोरण, संयमित नेतृत्व आणि योग्य जुळणी केली तर रोहित पुढील चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या विरोधी राजकारणाचा प्रमुख चेहरा होऊ शकतो. भविष्य त्याच्या मेहनतीवर आणि संघटनशक्तीवर अवलंबून आहे.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
कामगिरीवर आधारित वाटपाची गरज
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मांडलेली भूमिका वास्तववादी आहे. कर महसूल वाटपात सतत अपयशी ठरणाऱ्या राज्यांना जास्त हिस्सा देणे म्हणजे मेहनती राज्यांचा अन्याय. जे राज्य आर्थिक शिस्त पाळतात, गुंतवणूक आकर्षित करतात, कर संकलन वाढवतात आणि विकासाला गती देतात, त्यांना अधिक प्रोत्साहन मिळाले पाहिजे. सतत अपयशाला मदत केल्यास सुधारणा करण्याची प्रेरणा मरते. संसाधनांचा न्याय्य वापर म्हणजे परिणामकारक ठिकाणी गुंतवणूक. देशाला आज Cooperative नव्हे तर Competitive Federalismची गरज आहे. कामगिरीवर आधारित वाटप झाल्यास सकारात्मक स्पर्धा वाढेल, उद्योगस्नेही धोरणे आणि पारदर्शक प्रशासनाला चालना मिळेल. मागासलेल्या राज्यांना आधार देणे आवश्यक आहे, पण मदत ही सुधारणा घडवणारी असावी. जबाबदारी, पारदर्शकता आणि कामगिरी यांचा समतोल साधणारे मॉडेलच खरी प्रगती घडवेल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पुतळ्यांच्या राजकारणात हरवलेले मालेगाव
मालेगावच्या महापौर नसरिन बानो यांच्या कार्यालयीन भिंतीवर टिपू सुलतानाचा फोटो लावला गेला आणि हिंदू समाजात नाराजी उसळली. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची घोषणा झाली आणि कौतुकाचा वर्षाव झाला. उद्या बाबासाहेब, परवा महात्मा फुले, पुढे स्थानिक मुस्लिम नेत्यांच्या नावाने चौक व इमारती – अशी ही साखळी सुरूच राहणार. प्रश्न असा की, लोकांच्या भावनांना भुलवून घोषणांचा खेळ किती दिवस चालणार? पुतळे उभारणे म्हणजे इतिहासाचा सन्मान नव्हे, तर राजकीय गणिताचा भाग झाले आहे. समाजाला खऱ्या अर्थाने हवे आहे पारदर्शक प्रशासन, स्वच्छ रस्ते, सुरक्षित शहर आणि जबाबदार नेतृत्व. पुतळ्यांच्या घोषणांनी मतं मिळतील, पण नागरिकांचा विश्वास मिळणार नाही. शहराला पुतळे नव्हे, तर सुजाण प्रशासनाची गरज आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
विरोधी नेतृत्वाची स्पर्धा
राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांची राजकीय शैली अनेकदा संविधानिक संकेत नियमांच्या पलीकडे जाते. मात्र ही लढाई भाजपविरुद्ध नाही, तर भाजपविरोधी पक्षांच्या नेतृत्वासाठी आहे. दोघांचे वर्तन सरकारला धोका निर्माण करत नाही, कायदा-सुव्यवस्था बिघडवत नाही, किंवा सामान्य जनतेच्या जीवनात अराजक आणत नाही. लोकशाहीत विरोधक असतातच आणि त्यांना मोकळे सोडणे आवश्यक आहे. जनता वेळेवर हिशोब करते. तुरुंगात टाकणे किंवा कठोर कारवाई करणे उलट परिणामकारक ठरते. भारतीय मानसिकता आणि माध्यमांचा स्वभाव असा आहे की अशा कारवाया ‘बूमरँग’ होतात. म्हणूनच ठाम नेतृत्वासोबत उभे राहणे आणि विरोधकांना त्यांचा मार्ग चालू देणे हेच लोकशाहीचे खरे सौंदर्य आहे.
🔽
#AbhijeetRane #WestBengalPolitics #MamataBanerjee #BJP #RohitPawar #MaharashtraPolitics #ChandrababuNaidu #CompetitiveFederalism #Malegaon #StatuePolitics #OppositionLeadership








Comments