प्रशासकीय सुधारणांचा रोडमॅप; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
- dhadakkamgarunion0
- Nov 5
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
प्रशासकीय सुधारणांचा रोडमॅप; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
● राज्यातील प्रशासकीय गतिमानता वाढवण्यासाठी आणि व्यवसाय सुलभता अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 'जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती योजना २०२५' अंतर्गत जिल्हास्तरावर सुधारणांना गती देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांसाठी लवकरच 'चिंतन शिबिर' आणि विभागीय बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार प्रदान करण्यात येणार आहेत, ज्यामुळे विकासकामांना वेग मिळेल. महाराष्ट्रामध्ये उद्योगांना आणि विकासाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मंत्रालयापासून गावपातळीपर्यंत नागरिकांना सेवा-सुविधांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले आहेत. पारदर्शकता आणि लोकाभिमुखता ही सुप्रशासनाची त्रिसूत्री आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आता स्थानिक पातळीवर जलद आणि प्रभावी निर्णय घेणे जिल्हाधिकाऱ्यांना शक्य होईल, अशी अपेक्षा आहे.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments