top of page

पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा, गृहनिर्माण आणि प्रवास सवलत; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

  • dhadakkamgarunion0
  • Apr 11
  • 1 min read

 [  पंचनामा ]

==================

पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा, गृहनिर्माण आणि प्रवास सवलत; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

● आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील अटींचा पुनर्विचार करत अनुभवाची अट 30 वर्षांवरून 25 आणि वयोमर्यादा 60 वरून 58 वर्षांवर आणण्याच्या पत्रकार संघटनांकडून आलेल्या मागणीनुसार, यासंदर्भात सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कांदिवलीतील पत्रकार गृहनिर्माण योजनेतील सदनिकांचे दर कमी करण्यासाठी म्हाडाने योग्य तो तोडगा काढावा, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी निधीअंतर्गत वैद्यकीय मदतीची मर्यादा वाढवण्याबाबत विचार करण्यात यावा, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेसोबत सुसंगत योजना तयार करून त्याद्वारे पत्रकारांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटी महामंडळाच्या शिवनेरी व शिवाई बसमध्ये सवलत देण्यासंबंधी योग्य निर्णय घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

© -अभिजीत राणे

(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page