धडक ऑटो रिक्षा युनियनच्या शिष्टमंडळाची कस्तुरबा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसोबत सविस्तर चर्चा – रिक्षाचालकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी
- dhadakkamgarunion0
- Jun 6
- 1 min read
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनच्या बोरीवली रेल्वेस्टेशन येथील रिक्षा स्टँडच्या चालकांच्या विविध समस्या, स्थानिक पोलिसांकडून होणारा त्रास, बेसस्टँडवरील अडचणी, वाहतूक नियंत्रणातील अनियमितता याबाबत धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या सोबत शिष्टमंडळाने कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराव रणावरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी चालकांच्या सुरक्षेसोबतच सन्मानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी युनियनने केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी युनियनचे पदाधिकारी फरीद शेख, रवि बनसोडे तसेच स्टँडचे रिक्षा चालक पदाधिकारी तुकाराम नाईक, चंदू राऊत, विनायक मोरे, समाधान गायकवाड, प्रविण मोहिते आदी उपस्थित होते.
#रिक्षाचालक #धडकयुनियन #वाहतूकसमस्या #पोलीसभेट #रिक्षा_युनियन #धडक #TrafficIssues #PoliceMeeting #AutoUnionVoice #abhijeetrane #AR #kasturba #policeStation






















Comments