top of page

‌‘दि प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव समारंभ 2025‌’ यशस्वी संपन्न

  • 3 minutes ago
  • 2 min read

-------

‌‘दि प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव समारंभ 2025‌’ यशस्वी संपन्न

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुमिता सातारकर तर प्र्रमुख उपस्थिती म्हणून कामगार नेते अभिजीत राणे, महाराष्ट्राची रणरागिणी तृप्ती देसाई यांसह मान्यवरांची उपस्थिती

----

महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित 21 वा राज्यस्तरीय “दि प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव समारंभ 2025” हा भव्य पुरस्कार समारंभ उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीपणे पार पडला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना या सोहळ्यात ‌‘गौरव पुरस्कार‌’ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुमिता सातारकर (आंतरराष्ट्रीय वक्त्या, जीवन प्रशिक्षक, उपचारतज्ज्ञ व लेखिका) या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे, महाराष्ट्राची रणरागिणी तृप्ती देसाई, वरिष्ठ विधिज्ञ डॉ. अभिजित जनवाल, प्रशांत किसन गोसावी, श्री 5 प. पु. कृष्ण फणसे महाराज, कनकप्रभा रमेश आदी नामांकित व्यक्ती उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, महिला सबलीकरण, युवा सक्षमीकरण, कला, आरोग्य आणि राष्ट्रप्रेम या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले.

कामगार नेते अभिजीत राणे यावेळी बोलताना, ‌‘समाजातील कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक, कलाकार, महिला व युवा कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान होणं ही काळाची गरज आहे. समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींना असे गौरव देणे म्हणजे सकारात्मक आणि प्रेरणादायी ऊर्जा निर्माण करणे होय.”

महाराष्ट्राची रणरागिणी म्हणून ओळखल्या जणाऱ्या भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी समाजाला प्रेरित करणारा संदेश देत सांगितले,‌‘पुरस्कार हा केवळ सन्मान नसून पुढील जबाबदारीची जाणीव करून देणारा एक संकल्प असतो. महाराष्ट्रात बदल घडवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशा गौरवमंचाची गरज आहे. कामगार नेते अभिजीत राणे यांना आज जो राज्यस्तरीय पुरस्कार व मानपत्र मिळाले आहे. ते होणे गरजेचे होते त्यांच्या पुढील कार्यास माझ्या खुप खुप शुभेच्छा!‌’

समारंभाचे संयोजन राजीव लोहार (संस्थाध्यक्ष) यांनी केले. उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, तर संचालक डॉ. दगडू माने, ओमकार नागणवकर, चंद्रकांत कुंभार व महिला विभाग प्रमुख म्हणून मनीषा लोहार, कार्याध्यक्ष इम्तियाज मुजावर यांनी जबाबदारी पार पाडली. उत्स्फूर्त उपस्थिती, उत्कृष्ट नियोजन आणि मान्यवरांच्या प्रेरक विचारांमुळे “दि प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव समारंभ 2025” हा कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरला.

ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page