छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिजीत राणे यांची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई सखल मराठा मोर्चा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आयोजित कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर दूरदृष्टी असलेले लोककल्याणकारी राजे होते. स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमान या मूल्यांवर आधारित राज्यव्यवस्था उभी करून त्यांनी सामान्य जनतेला न्याय, सुरक्षा आणि सन्मान दिला. प्रशासन, नौदल, गडकोट, महिलांचा सन्मान आणि धर्मनिरपेक्ष धोरणे यामुळे महाराज आजही प्रेरणास्थान आहेत. आजच्या काळातही अन्यायाविरोधात लढण्याची, स्वाभिमानाने उभे राहण्याची आणि समाजहितासाठी काम करण्याची ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून मिळते. अशी यावेळी त्यांनी प्रतिक्रीया दिली.
#शिवजयंती #छत्रपतीशिवाजीमहाराज #जयशिवराय #स्वराज्य #धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #Mumbai #ShivJayanti

















Comments