'ग्रीन एनर्जी इकोसिस्टीम'कडे निर्णायक वाटचाल; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन
- dhadakkamgarunion0
- Jul 24
- 1 min read
Updated: Jul 25
[ पंचनामा ]
==================
'ग्रीन एनर्जी इकोसिस्टीम'कडे निर्णायक वाटचाल; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच उमरेड, नागपूर येथे वर्ल्डवन एनर्जीज प्रा. लि. च्या सौर पीव्ही निर्मिती सुविधेचे उदघाटन झाले. यावेळी त्यांनी १.२ गिगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन आणि २.५ मेगावॉट क्षमतेच्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे भूमिपूजन केले, तसेच प्रकल्प स्थळाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. यावेळी फडणवीस यांनी सांगितले की, वर्ल्डवन एनर्जीज् कंपनीने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत उभारलेला हा सौर ऊर्जा प्रकल्प अधिक उत्पादक आहे. या पॅनलमधून दोन्ही बाजूंनी ऊर्जा निर्माण होणार असून, पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत २५% अधिक ऊर्जा निर्माण होईल. यासोबतच हरित हायड्रोजन प्रकल्पामार्फत पर्यावरणपूरक ऊर्जेचे उत्पादन सुरू होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून उमरेड परिसरात एक व्यापक आणि शाश्वत ऊर्जा परिसंस्था निर्माण होणार असून, या भागाच्या औद्योगिक आणि पर्यावरणीय विकासात या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण वाटा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments