गोरेगावमध्ये “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार!, आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!
- dhadakkamgarunion0
- Sep 21
- 2 min read
मुंबईच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाची मतं महत्त्वाची : अमित साटम
गोरेगावमध्ये “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार!, आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!” कार्यक्रम भव्यदिव्य उत्साहात संपन्न
कामगार नेते अभिजीत राणेंकडून कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई | भारतीय जनता पार्टी, मुंबई व धडक कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार! आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!” हा भव्य कार्यक्रम गोरेगाव (प.) येथील सरदार वल्लभभाई पटेल हॉल येथे पार पडला. या कार्यक्रमात भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. विशेष अतिथी म्हणून स्थानिक आमदार विद्या ठाकूर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश माजी उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा, सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, भाजपा नेते ॲड. अमित मेहता, दिलीप पटेल उपस्थित होते. तसेच विशेष निमंत्रित म्हणून माजी नगरसेवक दिपक ठाकूर, हर्ष पटेल, श्रीकला पिल्ले, संदीप पटेल, गोरेगाव पश्चिम मंडळ अध्यक्ष अमेर मोरे, गोरेगाव दक्षिण मंडळ अध्यक्ष मिलिंद वाडेकर, गोरेगाव पूर्व मंडळ अध्यक्षा सिता जयस्वाल, मंडळ संयोजक विजय गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा सत्कार कामगार नेते अभिजीत राणे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला. विशेषतः भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
अमित साटम यांनी यावेळी बोलताना, “‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!’ ही मोहीम म्हणजे मुंबईकरांसाठी आपल्या शहराचे भविष्य ठरवण्याची सुवर्णसंधी आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात काय बदल हवेत, काय घडायला हवे आणि काय होऊ नये याबाबत स्पष्टपणे आपली मते द्यावीत. त्यासाठीची लिंक आपणास पाठवली जाईल.
मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नसून कामगार, मध्यमवर्गीय, उद्योजक, महिला आणि युवक यांच्या स्वप्नांची नगरी आहे. या सगळ्यांचा आवाज थेट भाजपापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. येत्या काळात भाजपा मुंबई या सूचनांना धोरणात्मक रूप देऊन शहराच्या विकासासाठी ठोस पावले उचलेल. या उपक्रमात प्रत्येक मुंबईकराने सहभागी होणे आवश्यक आहे.”
गोरगावच्या आमदार विद्या ठाकूर यांनी बोलताना, “मुंबईतील कामगार हे शहराचा कणा आहेत. त्यांच्या प्रश्नांवर उपाय शोधणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. भाजपा या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करत आहे.”
अभिजीत राणे यांनी बोलताना, कामगारांची ताकद हीच मुंबईची खरी ओळख आहे. आज कामगारांसाठी न्याय मिळवणे, त्यांचे हक्क सुरक्षित ठेवणे आणि त्यांच्या कष्टांचे मूल्य समाजापर्यंत पोहोचवणे हे धडक कामगार युनियनचे ध्येय आहे. भाजपा बरोबर राहून ही लढाई अधिक प्रभावीपणे लढण्याचा आमचा निर्धार आहे. कामगार, युवक आणि महिलांच्या समस्या ऐकून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या कार्यक्रमातून मिळालेला उत्साह दाखवतो की मुंबई बदलासाठी सज्ज आहे. ‘कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार! आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!’ हा नारा आता प्रत्यक्ष कृतीत उतरवायचा आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांनी, आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!’ ही मोहीम प्रत्येक नागरिकांचा सहभाग वाढवणारी आहे. भाजपा मुंबई या सूचनांना विकास आराखड्यात समाविष्ट करणार आहे.” असे यावेळी ते म्हणाले.
या कार्यक्रमात भाजपाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार!” हा नारा आता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी भाजपाने पाऊल उचलल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.
#MumbaiDevelopment #VoiceOfMumbaikars #BJPMumbai #WorkersStrength #PeopleFirst #FutureOfMumbai #BJPForChange #PublicParticipation #MumbaiGrowth #StrongLeadership

















Comments