top of page

गोरेगाव मराठा समाजतर्फे संकल्प सिद्धी चौक येथे भव्य शिवजन्मोत्सव; कामगार नेते अभिजीत राणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित

dhadakkamgarunion0
Feb 23
1 min read

गोरेगाव मराठा समाज (रजि) या संस्थेतर्फे संकल्प सिद्धी चौक येथे सलग पाचव्या वर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली. अभिजीत राणे यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन दर्शन घेतले. या दोन दिवसीय कार्यक्रमात १८ तारखेला पोवाडे आणि भजनाचा तसेच इतर करमणुकीचे कार्यक्रम पार पडले तर दुसऱ्या दिवशी १९ तारखेला सकाळी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक पूजा व आरती करण्यात आली. कामगार नेते अभिजीत राणे यांचा यावेळी आयोजकांकडून स्वागत करुन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्रमुख कार्यवाह समीर नाईक, सचिव दिपक पवार, गणेश घाडगे, विश्वास शेटे, संजय राणे , गौरव राणे, संजय खानोलकर, मेघा दातखिळे, वर्षा घाडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page