top of page

गेल्या 100 दिवसांत भाजप-शासित बीएमसीने...

  • dhadakkamgarunion0
  • 12 hours ago
  • 2 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

गेल्या 100 दिवसांत भाजप-शासित बीएमसीने मुंबईकरांचे तब्बल ₹1280 कोटी वाचवले आहेत! ठाकरेसेनेच्या काळात झू प्रकल्पासाठी फ्लायओव्हरची अट घालून 490 कोटींचे टेंडर, रेलिंगसाठी वेगळे 384 कोटींचे टेंडर, रस्त्यांवरील पट्ट्यांसाठी 150 कोटींचे स्वतंत्र कॉन्ट्रॅक्ट — हे सर्व रद्द करून भ्रष्टाचाराला आळा घातला. याशिवाय गारगाई-पिंजाळ धरण प्रकल्पात कंत्राटदारांना दिलेली 10% अतिरिक्त रक्कम कमी करून 1.94% केली, ज्यामुळे 280 कोटींची बचत झाली. या निर्णयांनी दाखवून दिले की “सत्तेत येणे म्हणजे लुटणे नव्हे तर वाचवणे” हा नवा संस्कार मुंबईत रुजतोय. भाजपच्या कारभाराने मनपाच्या खरेदीत पारदर्शकता आली असून मुंबईकरांना थेट आर्थिक फायदा मिळतोय. हे बदल भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची नवी दिशा दाखवतात.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मुंबईकरांच्या सुरक्षेच्या नावाखाली नियम वेगळे, अंमलबजावणी वेगळी – हीच खरी विसंगती आहे. गाडीच्या काचांवर काळी फिल्म लावणे RTO ने बंदी घातली कारण आत काय चालले आहे ते दिसत नाही, गुन्हेगारीला वाव मिळतो, अपघातात ओळख पटत नाही. पण चेहरा झाकणारा बुर्का मात्र परवानगीसह चालतो! CCTV फुटेज, तपासात अडचणी, गर्दीत धोका – हे सारे मुद्दे तिथेही लागू होतात. मग नियम समान का नाहीत? सुरक्षा सर्वोच्च असेल तर ती सर्वांसाठी समान हवी. एका बाजूला वाहनधारकांवर कठोर नियम, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक दबावामुळे सवलती – ही दुटप्पी नीती लोकशाहीला शोभणारी नाही. न्याय म्हणजे पक्षपात नाही, तर सर्वांसाठी समान धोरण. नियम हे सार्वत्रिक असले पाहिजेत, अन्यथा सुरक्षा हीच राजकारणाची बळी ठरेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

अहिल्या (अहल्या) हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ साधारणतः "दोषरहित", "निर्मळ", "सुंदर" किंवा "जिला कोणताही डाग नाही" असा होतो. हिंदू पुराणांमध्ये अहिल्या या महर्षी गौतम यांच्या पत्नी होत्या. त्यांची कथा रामायणात प्रसिद्ध आहे. भगवान राम यांच्या स्पर्शाने त्यांचा उद्धार झाला, अशी कथा सांगितली जाते. म्हणून "अहिल्या" हे नाव पवित्रता, सौंदर्य आणि पुनरुत्थानाचे प्रतीक मानले जाते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावापुढे पुण्यश्लोक अन् नावाच्या मागे देवी लावले जाते कारण अहिल्यादेवींनी जितक्या देवस्थानांचे, मंदिरांचे जीर्णोद्धार, पुनरुत्थान केलं तितकं अजूनही कुणाला जमले नाही.त्या त्यांच्या अहिल्या नावाप्रमाणे जगल्या.त्या धार्मिक कामातून पुण्य कमवून देवत्वाच्या जवळ गेल्या. अहिल्यादेवींचा इतिहास जगासमोर येतोय, त्यांच्या जीवनाचे राजकिय, प्रशासकिय, युद्धकला आणि शिल्पकला असे पैलू पुढं येत आहेत याचा आनंद होतोय.अहिल्यादेवींच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

बीड जिल्हा गुन्हेगारीचे केंद्र बनत चालले आहे. मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीनुसार त्यांनी अंगरक्षकाची पिस्तुल काढून डोक्याला लावून धमकी दिली आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर न्यायासाठी लढणाऱ्या धनंजय देशमुखांवरच आता गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलिसांनी कलम 109, 352, 351(2), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे. बीडमध्ये सतत होत असलेल्या हत्यांच्या, धमक्यांच्या आणि गँगशी संबंधित घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी तातडीने हस्तक्षेप करून बीडला गुन्हेगारी जिल्हा होण्यापासून वाचवणे अत्यावश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पिंपरी चिंचवडमधील हातभट्टी दारूमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने मदत जाहीर केली आहे. पण ही मदत प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांच्या पैशांतून दिली जाते, हेच अन्यायकारक आहे. ज्यांच्या गुत्त्यावरील दारूमुळे लोक मेले, त्यांच्याकडून दंड वसूल करूनच नुकसानभरपाई द्यायला हवी होती. कल्याणकारी राज्याची संकल्पना म्हणजे गरजूंसाठी आधार, पण हातभट्टी पिणाऱ्यांसाठी इतक्या तडफेने राबवली जाते, यावर कल्याणकारी राज्य संकल्पना मांडणार्‍या विल्यम बेव्हरिजसारख्या विचारवंताचाही विश्वास बसणार नाही. करदात्यांच्या पैशांचा वापर गुन्हेगारांना वाचवण्यासाठी नव्हे तर गुन्हेगारांकडूनच नुकसानभरपाई वसूल करण्यासाठी व्हायला हवा. अन्यथा करदात्यांचा विश्वास ढासळेल आणि शासनाची जबाबदारी प्रश्नचिन्हाखाली येईल. खरी न्याय्य मदत म्हणजे दोषींवर कारवाई करूनच पीडितांना दिलेली भरपाई.

🔽







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page