'खालिद का शिवाजी' हा वादग्रस्त चित्रपट महाराष्ट्रात तसेच भारतात कुठेही प्रदर्शित होणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवभक्तांना हमी
- dhadakkamgarunion0
- Aug 13
- 1 min read
'खालिद का शिवाजी' हा वादग्रस्त चित्रपट महाराष्ट्रात तसेच भारतात कुठेही प्रदर्शित होणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवभक्तांना हमी
-----
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी सर्व मराठा संघटना व शिवभक्तांच्या शिष्टमंडळाची सविस्तर भेट घेतली. या भेटीत ‘खालिद का शिवाजी’ या वादग्रस्त चित्रपटासंदर्भात सर्व शिवभक्तांच्या भावना मुख्यमंत्री महोदयांनी गांभीर्याने ऐकून घेतल्या.छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानाचे अस्मिता आहेत.त्यांच्या गौरवाशी चुकीच्या पद्धतीने छेडछाड करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही,असे त्यांनी ठामपणे सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, 'खालिद का शिवाजी' हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे,तर देशातील कोणत्याही चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही. चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक यांचा हेतू काय होता याची चौकशी केली जाईल जर हा चित्रपट चुकीच्या पद्धतीने तयार केला गेला असेल,तर संबंधित सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल.
या शिष्टमंडळात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील, कामगार नेते अभिजीत राणे,, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, अंकुश कदम,चेतन शेलार,व्यंकटेश मोरे,आशिष हिरे,नवनाथ शिंदे,सुभाष गायकर,रमेश आंब्रे,प्रवीण पिसाळ भारत पिंगळे,कमलेश पिंगळे,सागर शेलार,निलेश शेलार निलेश गवळी,राजेश पवार,आनंद केदार,यश बच्छाव,अभिषेक जाधव,दत्तू जाधव तसेच इतर समाजबांधव व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. #BanKhalidKaShivaji #ShivajiRespect #NoDistortion #CMFadnavisAssures #NationwideBan #ProtectHistory #ShivbhaktUnited #MarathaPride #AbhijeetRane









Comments