'कुंभमेळा २०२७'साठी फडणवीस सरकार सज्ज!
- dhadakkamgarunion0
- Oct 6
- 1 min read
Updated: 8 hours ago
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
'कुंभमेळा २०२७'साठी फडणवीस सरकार सज्ज!
● नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हे महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाचं प्रतीक ठरणार आहे. मात्र, या मेळ्याची तयारी केवळ श्रद्धेपुरती नव्हे, तर विकासाचा नकाशा बदलणारी ठरेल, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना थेट आदेश देत 'नाशिकमधील नवीन रिंग रोड आणि साधूग्रामचे काम तातडीने पूर्ण करा कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही' असा कठोर इशारा दिला. फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, 'रामकुंड आणि गोदावरी नदीपात्रातील पाणी नेहमी स्वच्छ राहिले पाहिजे. मलनि:स्सारण, रस्ते, विमानतळ, रेल्वे, वाहतूक सुविधा सर्व कामे दर्जेदार आणि वेगाने पूर्ण व्हावीत.' त्यांनी सीसीटीव्ही नियंत्रण, पोलिस निवासव्यवस्था, सार्वजनिक बससेवा, वाहनतळावर भंडारा व्यवस्था, आणि ‘एआय’ व ‘मार्व्हल’ तंत्रज्ञानाच्या वापरासह कायदा-सुव्यवस्थेवर काटेकोर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर त्यांनी ‘डिजिटल कुंभ’ या संकल्पनेचा प्रस्ताव ठेवत, प्रचार-प्रसिद्धीसाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यास सांगितले.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)

Comments