top of page

कामगार नेते अभिजीत राणे यांनी साजरी केली वंचित विद्यार्थ्यांसोबत भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मशताब्दी

  • dhadakkamgarunion0
  • Dec 27, 2024
  • 1 min read

भारतरत्न मा. पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त "एक दिवस श्रेष्ठम स्ट्रीट स्कुलच्या विद्यार्थ्यांसोबत..." असा आगळा-वेगळा उपक्रम भाजपा व धडक कामगार युनियनच्या माध्यमातून करण्यात आला. या शाळेतील सर्व विद्यार्थी निवाऱ्यापासून वंचीत असून, धडक कामगार युनियनच्या वेळोवेळी त्यांना मदत केली जाते.

भाजपा मुंबई उपाध्यक्ष व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

अभिजीत राणे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना, अटलजी हे भारताचे एकमेव असे पंतप्रधान होते ज्यांच्याकडे स्वतःचं घर नव्हतं. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इंटरनॅशनल निवासी शाळेच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण प्रवाहात आणले आहे. शासनाने अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, कोणीही शिक्षणापासून वंचित होऊ नये, शिवाय शिक्षण दर्जेदार मिळावे हा दृष्टिकोन समोर ठेवून अनेक शासकीय निवासी शाळा सुरू केल्या, तोच आदर्श ठेऊन आजचा कार्यक्रम आम्ही आज घेतला आहे. असे यावेळी ते म्हणाले.

यावेळी धडक कामगार युनियनचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


ree



ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page