top of page

"‘ऑपरेशन जुगार-मटका’ मोहिमेत अभिजीत राणे यांची ठाणे DCP प्रशांत कदम यांच्याशी चर्चा; कठोर कारवाईचे आश्वासन"

  • dhadakkamgarunion0
  • Aug 12
  • 1 min read

‘दै. मुंबई मित्र‌’ने समाज विधायक आणि लाखो कुटुंबे उध्वस्त करणाऱ्या जुगार-मटक्याच्या अड्ड्यानविरोधात ‌‘ऑपरेशन जुगार-मटका‌’ही मोहीम सुरू केली. या मोहिमे अंतर्गत ठाणे परिसरात खुलेआमपणे सुरू असलेल्या जुगार-मटक्यांच्या संपूर्ण पत्त्यांसह तसेच त्यांच्या मालकांची नावे ही प्रसिद्ध केली. केवळ वृत्त प्रसिद्ध न करता पोलीस प्रशासनातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना लेखी तक्रारीही दिल्या. याच बाबतीत सविस्तर चर्चा व कठोर कारवाई करण्यासंदर्भात ‌‘दै.मुंबई मित्र‌/वृत्त मित्र’चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी ठाणे शहर परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांची भेट घेतली व चर्चा केली यावेळी परिमंडळ 5 येथील मटका-जुगार अड्डयांवर लवकरच कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

ree
ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page