उद्धव ठाकरेंचे जुनेच कथानक; मुख्यमंत्री फडणवीसांचे जळजळीत टीकास्त्र
- dhadakkamgarunion0
- Dec 28, 2025
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
उद्धव ठाकरेंचे जुनेच कथानक; मुख्यमंत्री फडणवीसांचे जळजळीत टीकास्त्र
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे हे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे केले जाणार असल्याचे एकच जुने कथानक मांडत आहेत, असे फडणवीस म्हणाले. या कथानकात आता काहीतरी बदल करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी ठाकरेंच्या राजकीय भूमिकेची खिल्ली उडवली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. ते म्हणाले, जर उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या विकासावर आणि पायाभूत सुविधांवर भाषण केले, तर मी त्यांना एक हजार रुपयांचे बक्षीस देईन. हे आव्हान त्यांनी यापूर्वीही दिले होते, परंतु ठाकरेंनी अद्याप केवळ भावनिक राजकारण करण्यावरच भर दिला असून विकासाच्या मुद्द्याला बगल दिली आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. सध्याचे सरकार हे केवळ घोषणाबाजीवर नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारे आहे. मुंबईतील मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड आणि इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. विरोधकांनी या कामांवर बोलण्याऐवजी केवळ भीतीचे राजकारण करू नये, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)







Comments