आर्थिक प्रगतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला स्वावलंबनाचा मंत्र
- dhadakkamgarunion0
- Dec 22, 2025
- 1 min read
🔏 [ ⏺️ पंचनामा ]
▪️==================▪️
आर्थिक प्रगतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला स्वावलंबनाचा मंत्र
● मुंबईत आयोजित ‘वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम’ परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संस्कृती आणि अर्थव्यवस्थेवर आपले विचार मांडले. त्यांनी म्हटले की, हिंदू धर्म ही केवळ एक पूजा करण्याची पद्धत नसून ती एक महान जीवनशैली आणि प्राचीन विचारप्रणाली आहे. याच विचारसरणीने हजारो वर्षांपासून आपल्या महान संस्कृतीला जिवंत ठेवले आहे. सिंधू संस्कृतीपासून सुरू झालेला हा प्रवास अखंड असून भारतीय सभ्यता ही जगातील एकमेव सातत्यपूर्ण सभ्यता असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. फडणवीस यांनी नमूद केले की, भारत कधीही कोणावर आक्रमण करून मोठा झालेला नाही, तर आपल्या विचारांच्या आणि तत्त्वज्ञानाच्या जोरावर आपण जग जिंकले आहे. भविष्यात आफ्रिकेसारख्या खंडांमध्ये व्यापार वाढवून आपण जागतिक व्यापारात आपला वाटा २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. यासाठी स्वावलंबन आणि नाविन्यपूर्ण शोध ही आपली मुख्य शस्त्रे असतील.
© -अभिजीत राणे
(दै.मुंबई मित्र/वृत्त मित्र, मराठी/हिंदी)








Comments