आरेतील पर्यावरण धोक्यात; अभिजीत राणे यांनी पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष
dhadakkamgarunion0
Jun 19
1 min read
भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रवास कार्यक्रमात पालकमंत्री आशिषजी शेलार यांची जोगेश्वरी येथील राम मंदिर हॉलमध्ये आयोजित पालकमंत्री कार्यक्रमात भेट घेतली, यावेळी त्यांनी गोरेगाव मधील आरे परिसर हा इको सेनसेटिव्ही झोन असून ही येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशिरपणे चित्रपट स्टुडीओसाठी भरणी केली जात आहे. तसेच मुंबई उपनगरांमध्ये विकासकांकडून मोठ्याप्रमाणात परवानगी घेऊन वृक्षतोड करण्यात आली आहे, पालिकेकडून देण्यात आलेल्या सर्शत परवानगीमध्ये दिलेल्या शर्तीपैकी एक असलेली शर्त म्हणजे वृक्षतोड केल्यास वृक्षारोपण व त्यांचे संगोपन! परंतू याची कोणतीही पुर्तता विकासकांकडून करण्यात आलेली नाही. अशा लाखो वृक्षांचे वृक्षारोपण झालेले नाही आदी पर्यावरणासंदर्भात तक्रारींचे निवेदन व चर्चा अभिजीत राणे यांनी केली.





Comments