*"आरे वाचवा - मुंबईचे फुफ्फुस वाचवा!"*
- dhadakkamgarunion0
- Jul 8
- 1 min read
"आरे वाचवा - मुंबईचे फुफ्फुस वाचवा!"
-------
मुंबईला प्राणवायू देणाऱ्या आरे कॉलनीतील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी धडक पावले उचलली जात आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरे दुग्ध वसाहतीला भेट देऊन अतिक्रमणाची गंभीर पाहणी केली.
अनधिकृतरीत्या मोठे फिल्म स्टुडिओ, गोडाऊन आणि भूमी बळकावण्यासाठी बाहेरून डेब्रिज व मलबा आणून रचना केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे भूमाफियांचे कारस्थान तातडीने थांबवावे, अशी सर्वांची ठाम भूमिका आहे.
आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, ज्येष्ठ कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांची भेट घेऊन याबाबत ठोस कारवाईची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच पाहणी दौरा घेऊन कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
---
#SaveAarey #ProtectEnvironment #AareyForest #DhadhakKamgarUnion #AbhijeetRane #StopEncroachment #MumbaiGreenLungs #AareyBachao










Comments