top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • 4 hours ago
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

स्त्री हीच स्त्रीची शत्रू असते आणि राजकारणातील स्त्रिया हे वारंवार सिद्ध करतात. कोंग्रेस पक्षाच्या शिला दिक्षित या दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना दिल्लीने रेप कॅपिटल ऑफ इंडिया अर्थात बलात्कारांची राजधानी असणारे शहर म्हणून दुर्लौकिक प्राप्त केला होता. आता ममता बॅनर्जी या पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री असताना कलकत्ता शहराने हा लज्जास्पद बहुमान प्राप्त केला आहे. 9 ऑगस्ट 2024 अर्थात साधारण वर्षभरापूर्वी वैद्यकीय महाविद्यालयात ऑन ड्यूटी कर्मचारी महिलेवर बलात्कार केला गेला आणि हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयास ममता बॅनर्जी सरकार ने केला होता. सर्वोच्च न्यायाने “राष्ट्राच्या अंतर्मनाला भिडणारी घटना” असे या घटनेचे वर्णन केले आणि डॉक्टर सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय कार्यगट स्थापन करण्याचे निर्देश दिले होते . बेलीपुकूर, बेन्यापुकूर येथे अल्पवयीन तरुणीवर व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गुंगीचे द्रव्य मिसळून सामूहिक बलात्कार झाला. मागील आठवड्यात लॉ कॉलेज मधील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला आणि ते प्रकरण पण दाबण्याचा प्रयास होतो आहे. स्त्री राज्यकर्ता असूनही केवळ राजकीय लाभासाठी अन्य स्त्रियांवरील अत्याचारकडे दुर्लक्ष करते आहे हे खरच लज्जास्पद आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

उद्धव आणि राज एकत्र येण्याच्या वार्ता मीडियाने सुपारी घेऊन प्रसारित करायला सुरुवात केली आहे. मधल्या 18-19 वर्षांच्या काळात जखमांवर खपली धरली आहे. पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे त्यामुळे युती होईल असे खूप जणांना वाटत असताना या जखमांवरील खपली काढून त्यावर मीठ चोळण्याचे काम नारायण राणे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांनीच राज ठाकरेंना पक्षाबाहेर जाण्यास प्रवृत्त केले. शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरेच पूर्ण जबाबदार आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे. खासदार नारायण राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या, असे म्हणून प्रयत्न करत आहेत. मला आठवते, याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता. पक्षाबाहेर जाण्यास त्यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं, आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत?" असा सवाल त्यांनी केला. राणेंनी हा इतिहास जाहीर केल्याने आता एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार यात संशय नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जानी दोस्त आता जानी दुश्मन झाले आहेत. गेले काही दिवस अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांचा जिगरी मित्र एलोन मस्क यांच्यात जोरदार जुंपली आहे. आता हे भांडण खूप कडवट होते आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या धोरणांवरून टीका करणाऱ्या, नवा पक्ष काढण्याचा इशारा देणाऱ्या मस्क यांना यावेळी ट्रम्प यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका बाजूला ट्रम्प यांच्या महत्त्वकांक्षी 'वन बिग, ब्युटीफुल बिल' विधेयकावर सिनेटमध्ये गेल्या १२ तासांपासून मतदान चालू असताना मस्क त्यावर सातत्याने टीका करत आहेत. मस्क यांच्या टीकेवर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच त्यावर उत्तर दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की , "मी राष्ट्राध्यक्ष व्हावे यासाठी मस्क यांनी मदत केली होती. परंतु त्यापूर्वीच त्यांना माहित होते की, मी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याऱ्या धोरणांच्या विरोधात आहे. प्रत्येक व्यक्तीवर इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. कदाचित मानवी इतिहासात कोणालाही मिळाली नसेल एवढी सबसिडी मस्क यांना मिळाली परंतु आता मात्र, सबसिडीशिवाय त्यांना त्यांचं दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परत जावे लागेल. काहीही झाले तरी ट्रंप हे राष्ट्राध्यक्ष असल्याने मस्क यांनी आता माघार घेणेच त्यांच्या आणि त्यांच्या कंपनीच्या हिताचे असेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस अजेय का आहेत ? त्यांना कोणीच मात का देऊ शकत नाही यामागील रहस्य काय आहे ? राजकारणाचे तीन भाग आहेत. पक्षीय राजकारण , सत्तेचे राजकारण आणि विशुद्ध राजकारण. सामान्य जनतेला विशुद्ध राजकारणामध्ये काहीही रस नसतो. त्यांना पक्षीय राजकारणात प्रचंड रस असतो आणि त्या पेक्षाही त्यांना सत्तेचे राजकारण जाणून घ्यायला त्यातील डाव प्रतिडाव जाणून घ्यायला खूप आवडते. यातील मेख अशी आहे की विशुद्ध राजकारणाचा अभ्यास आणि पार्श्वभूमी नसेल तर पक्षीय राजकारण आणि सत्तेचे राजकारण नेमकेपणाने हाताळता येत नाही. कोंग्रेसी पक्षीय / दरबारी राजकारणात अत्यंत हुशार असतात. राष्ट्रवादीवाले आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे लोक सत्तेच्या राजकारणात हुशार असतात. फडणविसांसारखा अष्टपैलु खेळाडू तिन्ही क्षेत्रात झेंडा रोवतो. परंतु त्यांच्याशी लढणार्‍या एकाचाही विशुद्ध राजकारणाचा अभ्यास नाही आणि त्यामुळे त्यांना देवेंद्रजी लीलया मात देतात. मांजर जशी उंदराला खेळवते अक्षरशः त्याच पद्धतीने देवेंद्रजी महाराष्ट्रातील समस्त राजकारणी मंडळींना खेळवत असतात. त्यांना आपल्या तालावर नाचवत असतात.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सर्वसामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष एक सच्चा हाडाचा कार्यकर्त्याचा प्रवास. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा मित्र… आणि “प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः” हे ब्रीद मनाशी जपणारा लोकसेवक, संघाच्या विचारात घडलेला, जमिनीवरच्या कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेला, हा नेता पक्ष निष्ठा, कार्यकर्त्या प्रति असलेल्या प्रेमाच्या बळावर आज सर्वोच्च स्थानी पोचला आहे. रवीदादा किती मोठे झाले तरीही त्यांच्यातील कार्यकर्ता कधीच संपला नाही ही त्यांची खरी ओळख आहे, त्याचाच हा किस्सा.. भाजपचा एक कार्यकर्ता त्यांच्याकडे काम मागण्यासाठी इतर पक्षाच्या आमदाराचं शिफारस पत्र घेऊन आला होता. रवीदादांनी त्याला नम्रपणे सांगितलं की, तू आपल्या मंडळ अध्यक्षाचा शिफारस पत्र घेऊन आला असता तरीही निधी दिला असता" त्यांनी व्यक्त केलेली ही भावना सांगून जाते... प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रविंद्र दादा चव्हाण यांचे मनपूवर्क अभिनंदन आणि पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा!

🔽


 
 
 

Commentaires


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page