🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jun 6
- 3 min read





🖋️ अभिजीत राणे लिहितात
संघे शरणम गच्छामी !!! संघाचे सामाजिक अभिसरण कार्य सातत्याने सुरू असते. संघ अत्यंत आपलेपणाने सर्वांना वागवतो आणि या सद्वर्तनाला आता उत्तम फळे प्राप्त होत आहेत.नागपूर मुख्यालयात आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि एक प्रमुख आदिवासी व्यक्ती अरविंद नेताम यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते,नेताम हे एकेकाळी अविभाजित मध्य प्रदेशातील सर्वात मोठे आदिवासी व्यक्ती होते. काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री असलेले एक प्रमुख आदिवासी नेते अरविंद नेताम यांनी ही आज संघाच्या दाराशी येऊन संस्थापक डॉ. हेडगेवार यांना आदरांजली वाहिली.2023 मध्ये काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर छत्तीसगडमध्ये आदिवासींसाठी एक नवीन संघटना स्थापन करण्याचे काम करणाऱ्या नेताम यांना संघाच्या सूक्ष्मदृष्टीने ओळखले अन आदिवासींमध्ये मजबूत पकड निर्माण करण्यात गुंतलेल्या संघाच्या वतीने नेताम यांना प्रमुख पाहुणे बनवण्यात खूप खोलवरचा अर्थ आहे,बस्तर आणि सुरगुजाच्या आदिवासींमध्ये नेताम यांची चांगली पकड आहे. या सामाजिक अभिसरणामुळे आदिवासी पट्ट्यातील कोंग्रेस पुरस्कृत धर्मांतर मोहिमांना खिळ बसेल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी पोलिसांच्या कार्यशैलीचे वाभाडे काढले. पोलिसांकडून पैसे घेतले जात असल्याच्या आरोपांवरून आयुक्तांनी सर्वांना खडे बोल सुनावले. रस्त्यावरील गुन्हेगारीपासून अंडरवर्ल्डच्या कारवायांपर्यंत सर्व मुद्द्यांना हात घालत, नीट काम न केल्यास थेट कारवाई करण्याचा इशाराच भारती यांनी दिला. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिलीच गुन्हे परिषद असल्याने सर्वांची आयुक्तांसमोर ओळख परेड झाली आणि त्यानंतर भारती यांनी महिनाभरात केलेले अवलोकन आणि आपल्याला अपेक्षित असलेले काम याबाबत पोलिसांना मार्गदर्शन केले. बार, हुक्का पार्लर, जुगाराचे अड्डे यांच्यावर छापे टाकणे एवढेच समाजसेवा शाखेचे काम नाही, तर मानवी तस्करी, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे, देहव्यापाराच्या दलदलीतून महिलांची सुटका, बालकामगार शोधणे ही महत्त्वाची कामेही आहेत. त्यामुळे या शाखेतील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. बार तसेच इतर आस्थापनांवर लक्ष ठेवण्याचे काम स्थानिक पोलिसही करू शकतात. आयुक्तांनी दिलेल्या कानपिचक्यांचा किती परिणाम होतो हे लवकरच दिसून येईल. एकेकाळी स्कॉटलंड यार्ड बरोबर तुलना होणार्या मुंबई पोलिसांचे हे अधःपतन शोचनीय आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारताचे अनभिषिक्त युवराज , उर्मट शिरोमणि आणि विरोधी पक्षनेता या पदाला कलंक असलेल्या 52 वर्षाच्या तरुणाला अर्थात राहुल गांधींना आता वेसण घालण्याची वेळ आली आहे. भाजपाने आजवर त्यांच्या वागण्याची खिल्ली उडवली. त्यांचा उल्लेख पप्पू म्हणून केला परंतु हे महाशय नुसते उर्मट, अहंकारी आणि मूर्ख नसून ते दीर्घद्वेषी , भारताच्या प्रत्येक शत्रूचे कौतुक करना व्यक्ती आहेत. मला सत्ता मिळणार नसेल तर मग देश जळाला तरी चालेल अश्या पराकोटीच्या विकृत मानसिकतेला पोचलेल्या राहुल गांधीवर आता केंद्र सरकारने कारवाई करण्याची वेळ आली आहे. राहुल गांधी यांचा पप्पू मुखवटा फाडून त्यामागे दडलेला हिंदूद्वेष्टा , भारतद्वेष्टा चेहरा दाखवण्याचे काम आता भाजपाने केलेच पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांनी नवीन घोषणा दिली आहे,”नरेंदर सरेण्डर” ही खोटी घोषणा देणार्या राहुल गांधींच्या मनातील भारत द्वेष , मोदीद्वेष आणि हिंदू द्वेष आपण समजून घेणे आवश्यक आहे. पहलगाम हल्ला , ऑपरेशन सिंदूर या संपूर्ण काळात कोंग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका ही पाकिस्तानची मदत करणारीच होती. त्यामुळे आता कोंग्रेस पक्षाला आणि त्यांच्या विकृत राजपुत्राला राजकीय दृष्ट्या गाडून टाकणे आवश्यक झाले आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अजित पवार हे खुनशी राजकारणी आहेत. जिथे राष्ट्रवादीचा माणूस आमदार किंवा खासदार म्हणून निवडून येत नाही त्या तालुक्याला आणि जिल्ह्याला विशेष निधी नाकारणारा आणि हे उर्मटपणे बोलून दाखवणारा अपरिपक्व नेता म्हणजे अजित पवार. छगन भुजबळ वगळता इतरत्र ओबीसी समाज राष्ट्रवादीला मतदान करत नाही याचा त्यांना राग होता. त्यात लोकसभेला पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांना राज्यसभा खासदारकी दिल्याबद्दल विरोध केला म्हणून छ्गन भूजबळ यांना मंत्रिपद दिले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आज भुजबळांना मंत्री म्हणून संधी द्यावी लागली. ओबीसींचा, महाज्योतीचा, आदिवासींचा आणि दलितांचा निधी त्यांनी अन्यत्र वळवला आहे. याच अजित पवारांच्या नाकाबंदीमुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार महाविकास आघाडी फोडून भाजपसोबत आले होते हे ऊभ्या महाराष्ट्राने बघितले आहे.तसेच अर्थ खात्याशिवाय जिरवाजिरवीचे राजकारण करता येत नाही म्हणूनच अजित पवार भाजपसोबत आले. अजित दादांच्या या खुनशी राजकारणाला अर्थमंत्री पदाची ताकद मिळाली आहे. देवेन्द्रजींनी अजित पवारांना वेसण घालणे आवश्यक आहे कारण अर्थमंत्री म्हणून अन्याय अजित पवार करतील परंतु गरिबांच्या रोषाला देवेन्द्रजींना सामोरे जाण्याची वेळ येईल.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
अकेला देवेंद्र क्या करेगा? चार वर्षांपूर्वी सुप्रिया ताईंनी हा प्रश्न विचारला आणि अल्पावधीतच सत्ता परिवर्तन झाले. त्या सत्ताबदलाचे सारथ्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर दोन वर्षातच विधानसभा निवडणुका झाल्या आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. सत्तास्थानी आल्यावर उद्योग, पायाभूत विकास आणि परदेशी गुंतवणूक या गोष्टींवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यात त्यांना यश मिळून राज्यांमधील परदेशी गुंतवणूकीच्या क्षेत्रात पुन्हा एकदा महाराष्ट्राने मोठी आघाडी घेतली आहे. देवेंद्रजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. २०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्स इतकी मोठी करण्याचा त्यांचा निर्धार आहे. उद्योगांसमोर अडथळे निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले असले तरी असंवेदनशील नोकरशाहीवर अंकुश लावणे आणि खंडणीखोरीला चटावलेले राजकीय कार्यकर्त्यांना वठणीवर हे काम करावे लागणार आहे. “अकेला देवेंद्र क्या क्या करेगा?” हे समजून घेऊन आम्हीसुद्धा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी तुमच्या सोबत आहोत हेच दाखवून देण्याची ही वेळ आहे. आज औद्योगिक विकास साधायचा असेल तर खरोखरच देवेंद्र फडणवीस यांनी एकटयांनी प्रयत्न करून काहीच होणार नाही सगळ्यांनीच त्यांना साथ देणे आवश्यक आहे. किंबहुना जनतेने यासाठी राजकीय नेतृत्वावर दबाव आणावा लागणार आहे. ही काळाची गरज आहे.
🔽







Comments