top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • May 4
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

गुन्हेगारी 'जेंडर-न्यूट्रल' असते ! अर्थात केवळ पुरुष गुन्हेगारी करून नंतर राजकारणात हातपाय मारतात असे नसून महिला या मैदानात सुद्धा मागे नाहीत. एडीआर (असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म) च्या ताज्या अहवालात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. या अहवालानुसार, देशभरातील 28 टक्के महिला आमदार आणि खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत! लोकस

भेच्या 75 महिला खासदारांपैकी 24, राज्यसभेच्या 37 पैकी 10 महिला खासदार आणि 400 पैकी 109 महिला आमदारांनी स्वतःविरुद्ध गुन्हेगारी खटले दाखल असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय 78 महिला खासदारांवर खून आणि हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये, 75 पैकी 14 लोकसभा महिला खासदारांनी, 7 राज्यसभेच्या महिला खासदारांनी आणि 57 महिला आमदारांनी स्वतःविरुद्ध गंभीर गुन्हेगारी खटल्यांची माहिती दिली आहे. त्यामुळे मोदींनी महिलांना राजकीय आरक्षण दिल्याने संसदेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कमी येतील असा जो अंदाज मांडला होता त्याला महिला मंडल मात देणार असेच दिसत आहे. दागीमुक्त संसद हे अजून काही दशक तरी स्वप्नच रहाणार आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

राज घराण्यातील जावई बापूंचे अच्छे दिन संपत आलेले दिसत आहेत. मोदी सरकारने रॉबर्ट वाड्रा आणि डी एल एफ यांच्या घोटाळ्याची चौकशी सुरू केली. जावईबापूंचा एक पाय तुरुंगात गेला त्यामुळे चवताळलेल्या जावई बापुणणी पहालगाम हल्ल्यावर एक वादग्रस्त विधान केले. रॉबर्ट वाड्रा यांनी या दहशतवादी हल्ल्याचे कारण भारतातील मुस्लिमांवरील अत्याचार असल्याचे म्हटले होते. या विधानाबाबत वाड्रा यांच्याविरुद्ध चौकशीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे लखनौ खंडपीठ उद्या सुनावणी करणार आहे! वाड्रा यांचे हे वक्तव्य शत्रू राष्ट्राचे मनोबल वाढवणारे आणि देशभरातील मुस्लिमांना चिथावणी देणारे असल्याचे सिद्ध झाले तर अजून एका गुन्ह्यासाठी खडी फोडण्याची वेळ येणार हे नक्की आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

पेगासस अहवालावरून मध्यंतरी कोंग्रेस पक्षाने संसद आठवडाभर बंद पाडली होती. मोदी सरकारने विरोधकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पेगासेस हे स्पायवेअर वापरले असा आरोप करून कोंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी गदारोळ केला होता. या विरोधात कोंग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात सुध्दा गेला होता. तिथे मोदी सरकारने न्यायालयाला सिद्ध केले की हे स्पायवेअर देशविरोधी घटकांवर हेरगिरी करण्यासाठी वापरले आहे. अरा विरोधकांशी देशविरोधी घटक संपर्क साधत असतील तर याचे उत्तर तर विरोधकांनी द्यावे. काँग्रेस पक्षाच्या ऊचापतींना चपराक देत पेगासेस स्पायवेअर अहवाल सार्वजनिक करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे! देशविरोधी घटकांवर हेरगिरी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारचे उलट समर्थन केले आहे : "जर सरकार देशविरोधी लोकांच्या विरो धात स्पायवेअर वापरत असेल तर त्यात काय चूक आहे?" असा सवाल त्यांनी केला. कोंग्रेसचे एकंदर वाईट दिवस सुरू झाले आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

ओटीटी प्लॅटफॉर्म वर अश्लील कंटेंट सातत्याने दाखवले जात आहे परंतु माहिती प्रसारण खात्याची झोप काही संपायला तयार नव्हती. अखेरीस राज्य महिला आयोगच जागा झाला आहे. रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी या संदर्भात कारवाई सुरू केली आहे. उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रसारित होणाऱ्या हाउस अरेस्ट या शो मध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिला,पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहेत,महिलांना अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत असे व्हिडियो समाज माध्यमातून समोर येत आहेत.याविषयी जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने राज्य महिला आयोगाने याची स्वाधिकारात दखल घेतली आहे.हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच भारतीय न्याय संहिता,स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा,माहिती प्रसारण कायदा व अनुषंगिक कायद्यान्वये संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयोगाने पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत. आता त्यांच्या सूचनांचे पालन तरी सरकार कडून केले जाईल अशी आशा आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कोंग्रेस पार्टी आणि आयसीस या जागतिक पातळीवरील दहशतवादी संघटनेचे विचार एकाच वेळी इतके कसे जुळू शकतात ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आयसीस या दहशतवादी संघटनेची पोस्ट उम्माह सेन्ट्रलने शेअर केली त्यात त्यांनी महादेवाच्या मूर्तीचे मस्तक उडवून तिथे आयसीस चा झेंडा लावला होता. तर दुसरीकडे कोंग्रेस पक्षाने बनवलेल्या इमेज मध्ये त्यांनी मोदींचे शरीर दाखवून त्यावरील मस्तक उडवले होते आणि गायब असे शीर्षक दिले होते. एक्स हॅंडल वरील या फोटोने जनमानस संतप्त झाले आणि कोंग्रेस पक्षावर टीकेचे आसूड ओढले जाऊ लागले. त्यानंतर कोंग्रेस आणि आयसिस दोघांनी सुद्धा एकाच वेळी इमेज गायब करून टाकल्या. थोडक्यात प्रतिमा लावली एकाच वेळी उडवली एकाच वेळी... कोंग्रेस वालो ये रिश्ता क्या कहलाता है ?

🔽


ree



ree



ree



ree



ree


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page