top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Mar 31
  • 4 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेंस्की यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या खुनाचा कट रचला आहे का ? हा प्रश्न सध्या जागतिक पातळीवर चर्चेत आहे. कारण जेलेंस्की यांनी चार दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते की पुतीन फार काळ जगणार नाहीत. त्यांच्या या विधानाचा त्यावेळी अर्थ घेताना त्यांची तब्येत चांगली नसून रशियन वृत्तसंस्था ही बातमी दाबून ठेवत आहेत अश्या पद्धतीने घेतला होता. परंतु जेलेंस्की बोलले आणि त्यानंतर दोनच दिवसात पुतीन यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे वृत्त आहे. पुतीन यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील त्यांच्या समोरील असणार्‍या गाडीत बॉम्बस्फोट होऊन काही सुरक्षा कर्मचारी मारले गेले परंतु पुतीन मात्र या हल्ल्यातून बचावले आहेत. या घटनेमुळे युक्रेन रशिया शांतताचर्चा धोक्यात आली असून या घटनेनंतर रशियन फौजांनी युक्रेनवर अधिकच शक्तीशाली आणि क्रूर हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. २० % युक्रेन रशियाने यापूर्वीच गिळंकृत केला असून आता रशियन फौजा पुढील वाटचाल सुरू करत आहेत. एकंदर हे युद्ध संपण्याची शक्यता संपुष्टात येत आहे आणि त्यामुळे यूरोपियन राष्ट्रे चिंतित आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

रोम जळत असताना निरो फिडल वाजवत असल्याचे वर्णन आपण नेहमीच वाचतो. त्याच प्रमाणे पश्चिम बंगाल जळत आहे आणि तिथल्या मुख्यमंत्री लंडनमध्ये मुलाखती देत भारत सरकार आणि मोदींवर अश्लाघ्य भाषेत टीका करण्याची पप्पू राहुल गांधी यांची परंपरा चालवत आहेत. गेले काही दिवस पश्चिमबंगाल मधील मालदा नंतर काल मुर्शिदाबाद इथल्या नौदा इथे दंगली भडकल्या आहेत. बांगलादेशाच्या सीमेला लागून असलेल्या या भूभागात ममता दिदींनी डोळे बंद ठेवून आशीर्वाद दिल्याने बांगलादेशी घुसखोर हजारांनी आहेत ही सगळी मंडळी जमा झाल्याने या भागातील लोकसंख्या समतोल ढासळला आहे आणि मुस्लिमांची संख्या वाढली की ते विधर्मी लोकांवर हल्ले करतात हे जागतिक सत्य परत एकदा बंगालमध्ये सुद्धा दिसून येते आहे. हिंदूंवर हल्ले होते आहेत, त्यांच्या मालमत्ता जाळून टाकल्या जात आहेत , त्यांच्या लेकीबाळी नासवल्या जात आहेत आणि ममता बॅनर्जी मात्र लंडनमध्ये मोदींच्या राजवटीत देशाचा काहीही विकास झाला नाही. आर्थिक दृष्या देश प्रबळ झाला असून त्यांनी इंग्लंड ला मागे टाकले आहे हे मुलाखतकार स्वतः म्हणतो आहे आणि निरोचा पुंनर्जन्म असलेल्या ममता दीदी मात्र हे सगळे खोटे आहे हे आपल्या कर्कश्य आवाजात ओरडून सांगत आहेत असे विचित्र दृश्य बघण्यात आले.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मनसे कात टाकणार का ? हा कळीचा प्रश्न मनसेच्या पाडवा मेळाव्यानंतर निर्माण झाला आहे. मनसे पक्षाची विधानसभा 2024 मध्ये पूर्ण वाताहत झाली. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना निवडून आणण्यात सुद्धा राज यांना अपयश आले. परंतु आता मनसेने संघटनात्मक मोठे फेरबदल केले आहेत. संदीप देशपांडे आणि अमित ठाकरे हे सक्रिय होऊन कामाला लागले असून पाडवा मेळावा हे त्याचे पहिले उदाहरण आहे. पुढील वर्षभर संपूर्ण राज्यात नाही परंतु फक्त मुंबईतच मनसेने गाडून काम केले तर विरोधीपक्ष म्हणून त्यांना नक्कीच संधी मिळू शकते. महाविकास आघाडीवर लोकांची नाराजी आहे आणि विरोधी पक्षाची पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली आहे ही जागा मनसे भरून काढू शकते परंतु या मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे राज ठाकरे यांनी कुंभमेळयासंदर्भातील हाड हे वक्तव्य आहे. सध्या सर्वत्र हिंदुत्ववादी विचारसरणी प्रबळ होत आहे अश्या पार्श्वभूमीवर हिंदू मतदारांना चुचकारणे आवश्यक आहे राज ठाकरे यांनी त्यांना लाथाडत पुरोगामी होण्याचा प्रयास करणे त्यांच्या अंगलट येऊ शकते. त्यांनी मळलेल्या वाटेने जात सौम्य हिंदुत्ववादी नेता हीच प्रतिमा जपली तर महाराष्ट्रचे नवनिर्माण होईल तेंव्हा होईल परंतु मनसेचे नवनिर्माण निश्चितच सुरू होईल..

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

इंडियन मुस्लिम लीग आणि कोंग्रेस पक्ष यांनी आता अधिकृतरित्या हातमिळवणी केली असून ही भारताच्या राजकारणातील सर्वात धोकादायक अशी युती झालेली आहे. समस्त भारतीयांनी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे इंडियन मुस्लिम लीग याच पक्षाने आपल्या देशात फाळणी घडवली होती. नंतरही या पक्षाचे शाखा भारतात केवळ कोंग्रेसच्या नालायकपणामुळे सुरू राहिली आहे. या पक्षाचे मुस्लिम बहुल असलेल्या केरळात बराच प्रभाव असून सध्या केरळातील कम्युनिस्ट राजवटीला उलथून टाकून केरळातील सत्ता हस्तगत करण्यासाठी या दोन सत्ता पिपासू राजकीय पक्षांनी युती केली आहे. केरळ राज्यातील वायनाड मतदारसंघाच्या खासदार काँग्रेस नेत्या आणि राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी शनिवारी इंडियन मुस्लिम लीगचे प्रदेश अध्यक्ष सदीख अली शिहाब थंगल यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत हजेरी लावली. या पार्टीत या संभाव्य राजकीय समीकरणावर चर्चा झाल्याचे वृत्त असून समस्त हिंदूंनी या घटनाक्रमाबद्दल कोंग्रेस ला जाब विचारणे अत्यंत आवश्यक आहे. मुस्लिम लीग ला साथीला घेऊन कोंग्रेस भारताची अजून एक फाळणी सुद्धा घडवू शकते आणि म्हणूनच सामान्य नागरिकांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मार्क कार्नी यांनी पद स्वीकारले आहे. मार्क कार्नी यांनी पद स्वीकारल्या स्वीकारल्या अमेरिकेला अंगावर घेण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने सुरू केलेल्या टेरिफ युद्धात कॅनडा सुद्धा अमेरिकेवर टेरिफ लावणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. भारताशी संबंध सुधारण्यावर त्यांनी भर दिला असून जस्टीन ट्रूडो यांच्या काळातील चुका सुधारण्यावर आमचा भर असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ट्रूडो यांच्या काळात खलिस्तानी अतिरेक्यांना मोकळे रान दिले गेले होते. त्यांना कॅनडा सरकार आर्थिक मदत करत होती आणि केवळ ट्रूडो यांच्या दिशाहीन नेतृत्वामुळेच खलिस्तान हा संपलेला मुद्दा पुनरुज्जीवित झाला होता. कार्नी यांनी ही चूक सुधारण्याचे सुतोवाच केल्याने भारताला निश्चितच आनंद झाला आहे. कॅनडा मध्ये भारतीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी जात असत. राजकीय संबंधातील तणावामुळे भारताने आपल्या विद्यार्थ्यांना कॅनडा मध्ये जाऊ नका असा सल्ला दिला होता आणि त्यामुळे कॅनडाचे मोठेच आर्थिक नुकसान होत होते आता ती परिस्थिती सुद्धा पालटेल. एकंदर कार्नी यांची राजवट भारत कॅनडा संबंध सामान्य करण्यात यशस्वी होईल असे चित्र आहे.

🔽




ree

ree

ree

ree

ree




 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page