top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Mar 30
  • 4 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

कुणाल कामरा प्रकरण वाटते तितके सरळ आणि सोपे नाही. या संदर्भातील हाती येणार्‍या बातम्या धक्कादायक आहेत. कुणाल कामरा याने त्याच्या करियर मध्ये नरेंद्र मोदी अमित शहा या हिंदुत्ववादी नेत्यांवर अभिरुचीहीन टीका केली आहे. त्याने भारत देशावर अभिरुचीहीन टीका केली आहे. इतकेच नाही तर त्याचे संबंध भारतविरोधी असणार्‍या एन जी ओ मंडळींशी सुद्धा असून त्याने त्यांच्याकडून निधी सुद्धा घेतला आहे. तो भारतविरोधी किंवा हिंदू विरोधी शोज पैसे घेऊन करतो का हा प्रश्न निर्माण होत असून आत्ता एकनाथ शिंदे प्रकरणातील त्याची कविता सुधा निखळ विनोद नसून सुपारी घेऊन शिंदे यांची बदनामी करण्याचा हा उद्योग असल्याचा संशय येतो आहे. कारण संपूर्ण शिवसेना उबाठा सेना त्याच्या पाठीशी फारच जास्त ताकदीने उभी राहिल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचवल्या गेल्या आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्रातील पुरोगामी मंडळींचे मानसिक संतुलन ढासळले असून शासकीय खर्चाने त्यांच्यावर उपचार आवश्यक आहेत. महाराष्ट्रातील सगळे प्रश्न संपले असून आता फक्त दोनच विषय शिल्लक आहेत. औरंग्याची समाधी आणि वाघ्या कुत्र्‍याची समाधी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अन्त्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या श्वानाने चितेत झेप घेतली ही जुनी कथा आहे. त्याचे स्मरण म्हणून होळकरांनी 200 वर्षांपूर्वी तिथे वाघ्या या श्वानाची रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी समाधी बांधली आहे. आजवर ही समाधी कुणालाही बोचली नाही परंतु कोल्हापूरकर छत्रपतींना औरंग्याचे थडगे फुटणार आहे हे दिसू लागल्यावर ही समाधी बोचू लागली आहे. याचे उपसंहार सुद्धा आहेत. रायगड किल्ल्याची जी विकास समिती आहे तिचे अध्यक्ष हे महाराज आहेत. तिला मिळालेले 600 कोटी रुपये कुठे , कसे खर्च झाले याचा हिशोब लागत नाही. मग असे बाष्कळ वाद निर्माण करून कातडी वाचवण्याचे उद्योग सुरू आहेत. होळकरांनी उभारलेली समाधी निघाली तर त्यातून मराठा धनगर संघर्ष निर्माण करण्याचा कटू डाव आहे. परंतु या सगळ्याला भाजपा जबाबदार आहे. पुरोगामी असलेल्या संभाजी राजांना भाजपाने घरी जाऊन राज्यसभा खासदार पद दिले म्हणून यांना चार लोके विचारू लागली अन्यथा कोल्हापूरकर छत्रपतींच्या बद्दलचा आदर शाहू महाराजांच्या पाठोपाठच लोप पावला होता.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

आपला मिडिया आणि पुरोगामी मंडळी संभाजी भिडे गुरुजींचा द्वेष का करतात ? कारण गेली कित्येक वर्षे भिडे गुरुजी आणि त्यांच्या दहा लाख धारकरी परिवरातील मंडळी बलिदान मास पाळत आहेत. बलिदान मास म्हणजे काय ? धाकल्या महाराजांना ज्या यातना झाल्या, त्याची जाणीव रहावी म्हणून महिनाभर आपापल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करतात. महाराजांना झालेल्या यातनांचे स्मरण सर्वसामान्य माणसाला रहावे असा उद्देश. आपल्या आदर्शासाठी-आपल्या माणसासाठी छोटा-मोठा, कसलाही त्याग आपल्या उत्कट प्रेमाचे प्रतिक असतो. संभाजी महाराजांच्या आत्मार्पण दिनापासून पुढचं एक वर्ष खाण्यातला आवडता पदार्थ असेल किंवा चैनीची वस्तू असेल किंवा एखादी सवय - यांचा पूर्णपणे त्याग करायचा. त्याऐवजी त्या पैशांचा विनियोग गरजूंना, विद्यार्थ्यांना, धर्मार्थ संस्थांना सहाय्यार्थ करायचा असे या व्रताचे स्वरुप आहे. छत्रपती शंभूराजांचे आणि त्यांच्या त्यागाचे नित्य स्मरण रहावे आणि त्यातून आपल्या धर्माचे थोडेबहुत ऋण फेडावे असा विचार करून या बलिदान मासाचे पालन केले जाते. गडकोट मोहिमांच्या निमित्ताने तरुणाई चार दिवस मावळ्यांप्रमाणे आभाळाच्या कुशीत रहातात , घरून आलेली शिदोरी खातात आणि घोडखिंडीतील वाट पायी तुडवत स्वतःचे चित्त पावन करून घेतात. धर्म आणि राष्ट्र प्रेमाचा यज्ञकुंड प्रत्येक धारकर्‍याच्या चित्तात प्रज्वलित करून त्याला निर्व्यसनी , बलिष्ठ बनवणारे भिडे गुरुजी आपल्या राष्ट्रद्रोही पुरोगाम्यांना आणि राजकरणी मंडळींना कसे झेपतील ?

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

धनंजय मुंडे हे एक राजकारणी आहेत आणि एखादी गोष्ट तुटेपर्यंत ताणू नये हा विवेक त्यांना असणे अत्यंत आवश्यक आहे. मुंडे ज्या वंजारा समाजातून येतात त्यांच्यात बहुपत्नीत्व प्रथा कायद्याने गैर असली तरीही अजूनही रूढ आहे. त्यामुळे त्यांच्या ऑफिशियल दोन आणि अनऑफिशियल तिसरी पत्नी करुणा मुंडे या आहेत हे सत्य आहे. त्यामुळे हा कौटुंबिक वाद कोर्टात जाण्यापूर्वी सोडवण्याचा त्यांनी प्रयास करणेच योग्य होते. वाद कोर्टात गेला आहे, न्यायालयाने दोन लाख रुपये पोटगी द्या हा आदेश दिला आहे तर आतातरी प्रकरण मिटवून घेण्याच्या दृष्टीने त्यांनी हालचाल करणे आवश्यक होते, आता त्यांचा वकील कोर्टात भांडत बसला आहे की मुलगा हा धनंजय मुंडे यांचाच आहे पण करुणा मुंडे या पत्नी नाहीत. त्यांच्या विवाहाचा पुरावा नाही. अश्या पद्धतीचे खटले जितक्या लवकर मिटवले जातील तितके उत्तम कारण यातून नेत्याचे प्रतिमा भंजन होत असते. वंजारा समाजाला बहुपत्नीत्व प्रथेचे नवल नाही पण बाकी राज्यभर यातून नकारात्मक संदेश जातो. आधीच वाल्मिक कराड यांच्यामुळे मंत्रिपद गेले आहे , बदनामी झाली आहे अश्या वेळी कौटुंबिक आघाडी तरी शांत ठेवणे आवश्यक आहे हे धनंजय रावांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

नेपाळ मध्ये राजेशाही परत येणार , नेपाळ परत एकदा हिंदूराष्ट्र होणार. भारताच्या शेजारील नेपाळ या राष्ट्रात सामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे आणि मागण्या तीनच आहेत. पहिली मागणी राजेशाही परत आली पाहिजे आम्हाला ग्यानेन्द्र राजांच्या राजवटीत राहायचे आहे. लोकशाही रद्द करा. दुसरी मागणी नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे या देशाला लोकशाही राजवटीत कम्युनिस्ट मंडळींनी दिलेला सेक्युलर राष्ट्र हा दर्जा काढून टाका. तिसरी मागणी नेपाळ मधील सगळे मुसलमान हाकलून द्या. हा देश मुस्लिम मुक्त हवा. या संघर्षापुढे चीनचे समर्थन असणारी कम्युनिस्ट पार्टी हतबल झाली आहे. दुसरीकडे नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी मी जनतेच्या मागणीच्या विरोधात जाऊ शकत नाही हे सांगितल्यामुळे या आंदोलनाला चिरडणे अशक्य होऊन बसले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी तत्कालीन नेपाळच्या राजाने भारतात विनाशर्त विलीन होण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पहिले पंतप्रधान नेहरू यांच्या अनेक घोडचुकांच्या पैकी ही पण एक घोडचूक त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. अन्यथा नेपाळ आज भारताचा भाग असता. हिंदू राष्ट्रात मुसलमान राहुच शकत नाहीत हे सत्य या निमित्ताने अधोरेखित होते आहे आणि शेजारील भारतात सगळ्याच पक्षांना मुस्लिमांच्या प्रेमाचे भरते आले आहे यातून भारताला हिंदू राष्ट्र बनवणे किती कठीण आहे याचा अंदाज येऊ शकतो.

🔽


ree



ree



ree



ree



ree


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page