top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Mar 30
  • 4 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

योगी बाबांचे उत्तरप्रदेशातील सरकार दुर्घटना होण्याची शक्यताच नष्ट करण्यावर विश्वास ठेवून काम करते. उत्तर प्रदेश पोलिस एखाद्या दुर्घटनेतून लगेच शिकतात आणि भविष्यात तसे काहीही घडू नये याची काळजी घेतात यासाठी त्यांचे कौतुक केलेच पाहिजे आणि हाच पॅटर्न इतर राज्यांनी राबवणे सुद्धा आवश्यक आहे. संभल मध्ये सर्वेक्षण करताना दंगल उसळली होती. त्याचा मुख्य आरोपी संभल जामा मशि‍दीचा प्रमुख मौलाना जफर अली याला पकडून आत टाकला आहे आणि असे गुन्हे नोंदवून आत टाकला आहे की त्याला आजवर जामीन मिळू शकला नाही. रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर संभल मध्ये छतांवर आणि रस्त्यांवर नमाज पढण्यास बंदी घालण्यात आली आहे कारण याचा दुरुपयोग होतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. मशिदीत आणि दर्ग्यात नमाज पढण्यास मात्र काहीही बंदी नाही. महाराष्ट्र सरकारने सुद्धा या पद्धतीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. कारण नागपूर दंगलीतील पकडलेल्या गुन्हेगारांपैकी एक जण हा कमलेश तिवारी हत्याकांडातील जामीनावर सुटलेला गुन्हेगार आहे. नागपूर दंगलीतील मास्टर माइंड मौलाना अजून पोलिसांना शोधून काढता आलेला नाही. उत्साहाच्या भरात केलेल्या कारवाईवर न्यायालय ताशेरे ओढत आहे. महाराष्ट्र पोलिसांना योगीबाबांच्या पोलिसांकडे प्रशिक्षणाला पाठवायला पाहिजे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

महाराष्ट्र पोलिस आणि खासकरून नागपुर पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍या घटना वारंवार घडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील पोलिसांचे ही काम करण्याची पद्धत गृहमंत्री म्हणून त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल अविश्वास निर्माण करते आहे हे पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? गेली कित्येक वर्षे नागपुर हा गुन्हेगारीचा अड्डा झाले आहे आणि पोलिसांच्या आशीर्वादाने या गुंडांचे धाडस वाढत आहे हे पण उघड दिसून येते आहे. अक्कू यादवला पोलिसांच्या वरदहस्तामुळेच वारंवार जामीन मिळत होता शेवटी बायकांनी त्याला न्यायालयासमोर ठेचून मारले यात न्याय यंत्रणा आणि पोलिस खाते दोघांची बेअब्रू झाली होती. पण यातून दोघेही सुधारले नाहीत. नागपुर दंगलीला सामोरे जाण्यात पोलिस कमी पडले आणि नंतर कारवाई सुरू झाल्यावर न्यायालय कठोर कारवाई का करता ? म्हणून आडवे आले. नरेश वालदे यांच्या मुलीवर एका नाना नावच्या तरुणाचे एकतर्फी प्रेम होते. त्याने तिला मारहाण केली होती. छेडछाड करत होता म्हणून त्याला नरेश यांनी जाब विचारला , तर त्याने चिडून त्यांच्या घरावर दगडफेक केली. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली पण पोलिसांनी शून्य कारवाई केली. पण नाना संतापला आणि त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने नरेश वारदे यांना मारून टाकले. या खुनाला पोलीसच जबाबदार आहेत. त्यांनी वेळेत तक्रार दाखल करून घेऊन आरोपीला अटक केले असते तर ही वेळच आली नसती. देवेन्द्रजींनी पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सध्या आपल्या न्यायव्यवस्थेचे वाईट दिवस सुरू आहेत आणि या फाटलेल्या आभाळाला ठिगळे लावण्याचा प्रयास सर्वोच्च न्यायालय करत आहे. मागील आठवड्यात एका न्यायमूर्तीच्या घरात खोली भरून रक्कम सापडली. त्यापाठोपाठ एका न्यायमूर्तीने स्तन दाबणे , कपडे काढण्याचा प्रयत्न म्हणजे बलात्काराचा प्रयास नाही असा तुघलकी निर्णय दिला. एक तरुण मुलगी आपल्या आईबरोबर घरी जात असताना परिचित तीन तरुण तिला घरी सोडतो सांगून आईच्या परवानगीने मोटारसायकलवर घेऊन जातात. वाटेत गाडी थांबवून ते तिच्याशी छेडछाड सुरू करतात , तिला पूलाखाली घेऊन जातात तिचे स्तन दाबतात, तिच्या शरीराला हाताळू लागतात आणि तिच्या पायजम्याची नाडी सोडू लागतात. मुलगी घाबरून जाते आणि रडू लागते. त्याचवेळी पूलावरून एक ट्रॅक्टर जात असतो तिच्यातील लोक हा आवाज ऐकून मुलीला वाचवण्यास जातात. जर ते लोक तिथे आले नसते तर निःसंशय तिच्यावर क्रूर बलात्कार झाला असतं. हे प्रकरण कोर्टात गेल्यावर उच्च न्यायालयाने धक्कादायक निर्णय दिला. त्यांच्या मते स्तनांची हाताळणी, किंवा पायजम्याची नाडी सोडणे हा बलात्कार करण्याचा प्रयत्न होता असे म्हणता येणार नाही. या निर्णयाने न्यायालयावर प्रचंड टीका झाल्यावर सर्वोच्च न्यायालय जागे झाले आणि त्यांनी हा निर्णय फिरवला आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

"उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातले औरंगजेब आहेत. ज्या पद्धतीने औरंगजेबाने आपल्या वडिलांना आणि आपल्या भावांना त्रास दिला. त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या दिवसांत बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिला. ते नेहमी राज ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी आपल्या वडिलांच्या विचारांची प्रॉपर्टी घेतली नाही. तर त्यांनी आपल्या सख्ख्या भावांना प्रॉपर्टी करता त्रास दिला. ते वाद कोर्टापर्यंत गेले", असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हसके यांनी केले आहे. कुणाल कामराच्या कवितेमुळे उबाठा गट आणि शिंदे सेना यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली अश्लाघ्य कविता ही स्वयंप्रेरीत नव्हती तर त्यांना शिवसेना उबाठा गटाने कंत्राट दिले होते हे सर्वज्ञात सत्य आहे. कुणाल कामरा हा पुराना पापी आहे. त्याने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल सुद्धा असेच अत्यंत घाणेरडे वक्तव्य केले होते. परंतु भाजपा मूर्खांना डोके लावत नाही त्यामुळे तो सोकावला आहे, सुपार्‍या घेऊन राजकीय नेत्यांची बदनामी करू लागला आहे. अश्या प्रवृत्तीला वेसण घालण्यात कायदा कितपत यशस्वी होईल हे माहिती नाही परंतु शिंदे सेनेने हे प्रकरण हातात घेतल्याने त्याला जन्माची अद्दल घडेल यात संशय नाही.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

न्यायमूर्ती अभय ओक यांचे त्रिवार अभिनंदन. न्यायव्यवस्थेवर भारतातील नागरिक प्रचंड नाराज आहेत आणि कोलेजियन पद्धत राबवणारी न्यायव्यवस्था हस्तिदंती मनोर्‍यात बसली असून तिला सामान्य नागरिकांच्या या मताची पर्वाच नाही असे लोकांना वाटत होते. परंतु तसे नसून सहृदयी न्यायमूर्तींना सुद्धा आपल्या व्यवस्थेतील दोष ज्ञात असून त्यांना त्यात बदल करावा वाटतो आहे हे खरच आशादायक चित्र आहे. आपली न्यायव्यवस्था आदर्श नाही आणि तिच्यात आमुलाग्र बदल आवश्यक आहेत आणि हे मत एखाद्या सामान्य माणसाने किंवा राजकीय नेत्याने व्यक्त केले नसून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश अभय ओक असे म्हणाले आहेत. देशातील खटल्यांना लागणारा वेळ, देशातील न्याय व्यवस्थेची स्थिती आणि अनेक प्रकरणं दीर्घकाळ प्रलंबित राहणं याबाबत परखड भाष्य केलं आहे. तसंच कच्च्या कैद्यांना होणाऱ्या त्रासाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असं अनेकदा म्हटलं जातं. न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे हे म्हणायचा अधिकार राहिलेला नाही असं अभय ओक म्हणाले आहेत. न्यायमूर्तींनी तरीही अर्धेच भाष्य केले असे आमचे मत आहे. सरसकट दिले जाणारे जामीन आणि न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचार यावर सुद्धा त्यांनी भाष्य केले असते तर अधिक उत्तम झाले असते.

🔽


ree

ree

ree

ree

ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page