🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- 15 minutes ago
- 3 min read





🖋️ अभिजीत राणे लिहितात
झेलेन्स्कीवर वाढलेले सावट
पुतिन यांच्या निवासस्थाना वरील ड्रोन हल्ल्यानंतर रशिया-युक्रेन संघर्षात नवे वळण आले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने हा हल्ला युक्रेनकडून झाल्याचा दावा केला असून, मॉस्कोने झेलेन्स्कीला अधिकृतपणे ‘दहशतवादी’ ठरवले आहे. यामुळे त्याला दिलेली सुरक्षा हमी मागे घेण्यात आली असून रशियाला आता मुक्तपणे कारवाई करण्याचा अधिकार मिळाल्यासारखे दिसते. या घटनेनंतर रशिया संघर्ष निराकरणाच्या अटींवर पुनर्विचार करणार आहे, मात्र अटी प्रादेशिक नसून राजकीय असतील अशी शक्यता आहे. बेलारूसमध्ये रशियाने अण्वस्त्र तैनात करून आपली ताकद दाखवली आहे. झेलेन्स्कीची भूमिका संपली असल्याचे काही विश्लेषकांचे मत असून, भविष्यात त्याचे राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते. या घडामोडींनी युद्ध अधिक गुंतागुंतीचे झाले आहे आणि जागतिक राजकारणात नवे समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
स्वीडनचा बदलता चेहरा
वीस वर्षांपूर्वी स्वीडन हा जगातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित देश मानला जात होता. कमी लोकसंख्या, उच्च दर्जाचे नागरिक अधिकार, आर्थिक व सांस्कृतिक संपन्नता यामुळे तो आदर्श राष्ट्र ठरला होता. मात्र कालांतराने डाव्या विचारसरणीच्या राजकारणाने शरणार्थ्यांसाठी दारे उघडली. या धोरणामुळे समाजात मोठे बदल घडले. आज महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. हजारो गुन्हे नोंदवले गेले असून त्यात शरणार्थी समुदायाचा सहभाग दिसतो. एकेकाळी सुसंस्कृत व सुरक्षित असलेला समाज आता असुरक्षिततेच्या छायेत आहे. स्वीडनचा अनुभव दाखवतो की मानवी हक्क व उदार धोरणे महत्त्वाची असली तरी सामाजिक संतुलन राखणे तितकेच आवश्यक आहे. अन्यथा सुरक्षिततेचा पाया हादरतो आणि समाज अस्थिरतेकडे झुकतो.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
रशियाचा आर्थिक पलटवार
युक्रेन युद्धाला चार वर्षे पूर्ण होत असताना रशियाने पाश्चिमात्य राष्ट्रांच्या अपेक्षांना छेद दिला आहे. अमेरिकेने रशियाला SWIFT नेटवर्कमधून बाहेर काढले, युरोपियन युनियनने तब्बल ३०० अब्ज डॉलर्स फ्रीज केले—उद्देश होता रशियाची अर्थव्यवस्था कोसळवणे. पण उलट घडलं. पुतिन यांनी व्होक्सवॅगन, डॅनोन, कार्ल्सबर्ग, फोर्टम, युनिपर यांसारख्या युरोपियन कंपन्यांचे रशियातील मालमत्तेचे राष्ट्रीयीकरण केले. यामुळे थेट ८–१० अब्ज युरोचे नुकसान झाले, अप्रत्यक्ष फटका आणखी मोठा आहे. युरोप मंदीकडे झुकत असताना रशियाचा GDP वाढत आहे. पुतिन यांनी स्पष्ट केले आहे—जिंकलेली भूमी परत दिली जाणार नाही, युक्रेन कधीही नेटो सदस्य होणार नाही, आणि सर्व आर्थिक निर्बंध हटवले गेले पाहिजेत. युरोपला आवश्यक उत्पादनांसाठी आता रुबल्समध्ये व्यवहार करावा लागेल. हीच डीडॉलरीकरणाची सुरुवात ठरू शकते.
🔽
🖋️ *अभिजीत राणे लिहितात
भारतीय अर्थव्यवस्थेची झेप
२०२५-२०२६ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था तब्बल ७.४% दराने वाढेल असा अंदाज अमेरिकेतली अग्रगण्य अश्या फिच आणि इक्रा या रेटिंग एजन्सींनी वर्तविला आहे. यापूर्वी कोणत्याही संस्थेने ७% पेक्षा जास्त वाढीचा अंदाज दिला नव्हता. ही झेप भारतासाठी ऐतिहासिक ठरली आहे. कालच भारताने अधिकृतरीत्या जाहीर केले की आपली अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. हे यश केवळ आकड्यांचे नाही तर जागतिक स्तरावर भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. काही राजकीय नेत्यांनी पूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेला ‘मृत’ म्हटले होते, परंतु आज तीच अर्थव्यवस्था जगाला आश्चर्यचकित करत आहे. विरोधकांनी मौन बाळगले असले तरी वास्तव हे आहे की भारताची आर्थिक गाडी वेगाने पुढे सरकत आहे. हे यश टिकवण्यासाठी स्थिर धोरणे, गुंतवणूक आणि जनतेचा विश्वास कायम ठेवणे अत्यावश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
आयारामांची राजकारणातील कुबडी
नगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेलं प्रचंड जनादेश हे त्यांच्या संघटनशक्तीचं द्योतक आहे. अशा वेळी पक्षनिष्ठांना तिकीट देऊन त्यांच्या सेवेला मान्यता दिली असती तर सकारात्मक संदेश गेला असता. मात्र आयारामांना उमेदवारी देऊन बाहेर असा आभास निर्माण होतो की भाजप अजूनही स्वतःच्या ताकदीवर नव्हे तर बाहेरून आलेल्या कुबड्यांवर अवलंबून आहे. हे पाऊल केवळ सुड, द्वेष आणि कोणाला तरी संपवायच्या आसुरी महत्वाकांक्षेतून घेतले जात असल्याची छाप पडते. पण राजकारणात कोणालाही कायमच संपवता येत नाही. एक काळ होता की भाजपचे संसदेत दोनच खासदार होते, तरी आज ते सत्तेच्या शिखरावर आहेत. तसेच आज अपयशी ठरलेले पक्ष उद्या पुन्हा मोठे होऊ शकतात. ही सत्यता विसरून चालणार नाही. राजकारणात शाश्वत शत्रू नसतात, फक्त संधी आणि बदलते काळ असतो.
🔽







Comments