top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Sep 28
  • 2 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

दिवाळीच्या तोंडावर आंदोलनांचा गोंधळ टाळा! महाराष्ट्र अतिवृष्टीच्या दुःखात आहे आणि दिवाळीच्या तोंडावर एस.टी. कर्मचारी व पत्रकार महासंघाच्या संभाव्य आंदोलनांनी जनतेच्या अडचणी वाढू शकतात. सणाच्या काळात वाहतूक ठप्प होणे, सेवांमध्ये अडथळा निर्माण होणे हे टाळणे अत्यावश्यक आहे. सरकारने एस.टी. कर्मचाऱ्यांना बोनस व अन्य मागण्या तातडीने मान्य करून शांतता प्रस्थापित करावी. जनतेचे हाल होणार नाहीत याची जबाबदारी शासनाची आहे. दिवाळी हा केवळ सण नाही, तर कोट्यवधी नागरिकांच्या भावनांचा उत्सव आहे. पत्रकार महासंघाच्या मागण्या वेगळ्या असल्या तरी सध्या त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल. सशक्त माध्यम क्षेत्राला सणाच्या काळात आंदोलनाची गरज नाही. सध्या प्राधान्य जनतेच्या सुखद आणि सुरक्षित दिवाळीसाठी असावे. संयम आणि संवेदनशीलता हीच सध्या काळाची गरज आहे

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सीमावर्ती बिहार आणि राजकीय गरज! “एवढे लाड का?” हा सवाल जितका भावनिक आहे, तितकाच तो धोरणात्मकही आहे. बिहार आजही बिमारू राज्यांच्या यादीत असून, त्याची सीमावर्ती स्थिती देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील आहे. सीमेजवळील जमिनींचे भाव कोटींमध्ये पोहोचले आहेत—कारण घुसखोरी, लपण्याच्या जागा आणि अस्थिरता. या पार्श्वभूमीवर भाजपची सत्ता येणे केवळ राजकीय नव्हे, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही आवश्यक ठरते. दहा हजार कोटींचा खर्च देशाच्या सीमांची सुरक्षितता आणि दीर्घकालीन विकासासाठी तितकासा मोठा नाही. सत्ता आल्यावर विकासाचे मार्ग स्पष्ट होतील आणि अस्थिरतेचे प्रकार हळूहळू कमी होतील.बिहारसारख्या राज्यात राजकीय स्थैर्य हे राष्ट्रीय हिताचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रश्न लाडाचा नाही—तो दूरदृष्टीचा आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

लडाख हिंसेमागे सोनम वांगचुक यांचे वक्तव्य? केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये थेट सोनम वांगचुक यांचे नाव घेत, लडाखमधील अलीकडच्या हिंसाचारास त्यांच्या भडकाऊ वक्तव्यांना जबाबदार ठरवले आहे. ही अधिकृत प्रतिक्रिया सरकारच्या स्तरावरून आल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. वांगचुक हे पर्यावरण आणि सामाजिक विषयांवरील कार्यासाठी प्रसिद्ध असले तरी, त्यांच्या भाषणांनी स्थानिक जनतेत असंतोष निर्माण झाला आणि त्यातूनच हिंसक आंदोलन उफाळले, असा मंत्रालयाचा दावा आहे. या आरोपांमुळे वांगचुक यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांच्या समर्थकांनी या आरोपांना राजकीय रंग दिला आहे. मात्र, सरकारकडून थेट नाव घेऊन आरोप केल्यामुळे या प्रकरणाची चौकशी आणि परिणाम अधिक गहन आणि दूरगामी ठरणार आहेत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सोशल मिडियावरून भारतविरोधी षड्यंत्र? अमेरिकन सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सने भारत व्यापला आहे—फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपसारख्या माध्यमांतून सरकारविरोधी मजकूर क्षणात व्हायरल होतो, तर सकारात्मक लिखाण दडपलं जातं. हे सर्व प्लॅटफॉर्म्स परदेशी कंपन्यांच्या नियंत्रणात असल्यामुळे भारतविरोधी नेरेटिव्ह पसरवले जातात. दुर्दैवाने, काही विरोधी पक्षही या खेळात सहभागी दिसतात. राहुल गांधी भारताला ‘डेड इकॉनॉमी’ म्हणतात, पण आयफोन १७ प्रो मॅक्स दोन दिवसांत आउट ऑफ स्टॉक होतो—हे भारताची खरेदीशक्ती दाखवतं. रशिया आणि चीनने अमेरिकन सोशल मिडिया देशातच घुसू दिला नाही, म्हणून ते सुरक्षित आहेत. भारताला आता स्वतःचा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म उभारण्याची गरज आहे. अन्यथा अशा पोस्ट्समुळे लडाखपासून बिहार निवडणुकांपर्यंत देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न होईल. हे केवळ तंत्रज्ञानाचं नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेचंही प्रश्न आहे.

🔽

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page