🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Aug 11
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारताने नुकताच ब्रिटन सोबत मुक्त व्यापार करार केला आहे. भारत आणि ओमान पुढील तीन महिन्यांत मुक्त व्यापार करार जाहीर करणार आहे यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. भारत सौदी अरेबिया सोबतचा द्विपक्षीय गुंतवणूक करार अंतिम टप्प्यात आला असून लवकरच त्यावर स्वाक्षरी होईल. सहा देशांच्या गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल ज्यात बहारीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात हे देश सामील आहेत आणि युरोपियन युनियन (27 युरोपियन देश) सोबतचे मुक्तव्यापार करार सुद्धा चांगल्या गतीने चर्चेत असून ते सुद्धा लवकरच पूर्णत्वाला जातील. या सर्व देशांशी भारताने गेल्या 11 वर्षात उत्कृष्ट संबंध निर्माण केलेले असून या 33 पैकी 7 देशांनी तर त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार (अर्थात त्यांच्या देशाचे भारतरत्न) पंतप्रधान नरेन्द्र मोदींना देऊन त्यांचा व भारताचा याआधीच सन्मान केला आहे. रशिया तर मित्रदेश आहेच, ब्रिक्स मधील इतर देशांसोबतही भारताचे चांगले व्यापारी संबंध आहेत आणि ते अजून मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी भरपूर वाव पण आहे. थोडक्यात भारताने अमेरिकेला शून्य निर्यात करण्याची आणि तरीही आपल्या अर्थव्यवस्थेला मजबूत ठेवण्याची पूर्वतयारी करून झाली आहे. ट्रंप तात्या आणि राहुल गांधी दोघेही तोंडावर आपटणार यात संशय नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
जेव्हा ट्रम्प शासनाने भारत रशियाकडून तेल विकत घेतो म्हणून भारतावर २५% जास्त इम्पोर्ट ड्युटी म्हणजे एकूण ५०% इम्पोर्ट ड्युटी लावणार असल्याचे जाहीर केले तेव्हा तेथे हजर असलेल्या एका वृत्तपत्र प्रतिनिधीने विचारले की रशियाकडून कच्चे तेल तर चीन सुद्धा विकत घेतो.मग त्याच्यावर तुम्ही वाढीव इम्पोर्ट ड्युटी का लावलेली नाही?त्यावर ट्रम्पच्या त्या प्रतिनिधीने उत्तर दिले की आम्हाला अमेरिकेसमोर अडचणी उभ्या करायच्या नाहीत.मोदींचे भारताला केवळ सामरिक नव्हे तर आर्थिक दृष्ट्या तसेच जागतिक स्तरावरील राजकारणात ही एक प्रबळ,प्रगत देश का बनवायचे आहे याचे कारण ट्रम्पच्या त्या अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तरात आहे.ज्यांना राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थ यांच्या पलीकडचे काही दिसत नाही आणि समजतही नाही अशा राजकीय पक्षांना या पुढे थारा देऊ नका.देशाच्या स्वाभिमानी आणि दबदबा युक्त जागतिक अस्तित्वासाठी भारतीयत्व आणि भारताचे हित अभिमानाने जपणाऱ्या राजकीय पक्षांना च नेहमी पाठिंबा द्या.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
राहुल गांधी शपथपत्र देण्यास नकार देतो आहे ही गोष्ट सामान्य नागरिकांनी समजून घेतली पाहिजे.कोर्ट ही संस्था देशाच्या घटनेनुसार स्थापन झालेली आहे आणि तिचा कारभार चालवण्यासाठी काही नियम करण्याचा व त्या नियमांप्रमाणे सर्वांनी चालण्याचा आग्रह धरण्याचा कोर्ट या संस्थेला अधिकार आहे,अगदी तसेच घटनेनुसार स्थापन झालेल्या निवडणूक आयोगाच्या बाबतीत आहे.त्यामुळे राहुल गांधी जर त्याच्या सहीचे प्रतिज्ञा पत्र देण्यास कोणतेही कारण सांगून टाळाटाळ करत असेल तर तो खोटे आरोप करत आहे असे बिनदिक्कतपणे म्हणता येते. दुसरा मुद्दा असा की आरोप निवडणूक आयोगावर करायचे आणि चौकशी सुद्धा निवडणूक आयोगानेच करावी असे म्हणायचे हे म्हणजे ज्याला चोर म्हणता त्यालाच पोलिसगिरी करायला सांगण्यासारखे झाले.ते योग्य नाही. म्हणून राहुल गांधी ने सरळ निवडणूक आयोगाविरुद्ध कोर्टाकडे जावे. ते तो का करत नाही? कारण त्याला मुळातून निवडणूक आयोग खरा आहे हे माहितीच आहे. फक्त हे खोटे आरोप करून त्याला नागरिकांचा घटनात्मक संस्थांवरील विश्वास उध्वस्त करायचा आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
काही आठवड्यांपूर्वी ट्रम्प म्हणाला होता की त्याला मिळालेल्या माहितीनुसार मे २०२५ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात पाच किंवा सहा विमाने पाडण्यात आली.ती पाकिस्तानची होती की भारताची होती ते मात्र ट्रम्प ने सांगितले नव्हते.इकडे भारतात एका देशद्रोही राजकीय पक्षाचा नेता पुन्हा पुन्हा विचारत होता की त्या युद्धात भारताची किती विमाने पाडली गेली आणि त्यातील राफेल विमाने किती होती?आज भारतीय विमान दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी सांगितले की या भारत पाक युद्धात भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली.त्यापैकी एक एफ-१६ हे अमेरिकन फायटर जेट होते.खेरीज पाकिस्तानचे एक मोठे अवकाशातून टेहळणी करणारे विमान ही पाडण्यात आले. ही विमाने ३०० कि.मी.अंतरावरून एस-400 चा वापर करून पाडण्यात आली.एअर चीफ मार्शल सिंह यांनी स्पष्ट केले की युद्धात सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते.भारताच्या राजकीय इच्छाशक्तीमुळेच सैन्यदले ऑपरेशन सिन्दुर मध्ये मोठा पराक्रम गाजवू शकली असे ही त्यांनी सांगितले.एअर चीफ मार्शल ए पी सिंह यांच्या या भाषणामुळे अनेकांचे कुतूहल आज शमले असेल असे वाटते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
शरद पवार म्हणजे ती गाय आहे जिला आपली शिंगे मोडून अजूनही वासरांमध्ये वावरण्याची हौस आहे. काल त्यांनी एक गौप्यस्फोट केला."मला आठवतंय विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोन लोक, त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे, त्यांनी जे जे गॅरंटीचं सांगितलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हंटलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये असं झालं. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्विकारु असं ठरवलं"उभ आयुष्य राजकारणात गेलेला माणूस इतका बालिश बोलू शकतो ???
🔽
#IndiaTrade #FreeTrade #Modi #Trump #RahulGandhi #Russia #GCC #EU #BilateralTies #IndiaPride #Geopolitics #Defence #S400 #AirForce #SharadPawar #Politics





Comments