🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Aug 8
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मोदीजी जे 'ना खाऊंगा, ना खाने दूंगा' असं म्हणत असतात ना.. त्याचेच एक उदाहरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केलेले 'कर्तव्य भवन-03' ही केवळ एक सुरुवात आहे. केंद्र सरकारचे 2027 च्या मध्यापर्यंत अशा एकूण 10 सेंट्रल सेक्रेट्रिएट (सचिवालय) इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. या सर्व सचिवालयांच्या इमारती 'सेंट्रल व्हिस्टा योजने'चा एक महत्त्वाचा भाग आहेत. या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे सर्व केंद्रीय मंत्रालयांना एका आधुनिक, शासकीय मालकीच्या प्रशासकीय परिसरात एकत्र आणणे. यातून सार्वजनिक निधीचा अधिक चांगला उपयोग, खासगी जमिनीच्या/इमारतींच्या मालकांवरील अवलंबन संपविणे आणि सरकारच्या मालकीच्या मालमत्तांचे निर्माण सुनिश्चित करण्यात येत आहे. यामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ही सगळी कार्यालये आजवर भाड्याच्या इमारतीमधून चालवली जात होती. आता भाड्याच्या प्रॉपर्टी मधून मंत्रालयांना हलवून स्वतःच्या मालकीच्या इमारतींमध्ये स्थलांतर केल्यामुळे मोदी सरकार दरवर्षी तब्बल ₹1500 कोटींची बचत करणार आहे! आय रिपीट : ₹1500 कोटी!!!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
“अमेरिकेच्या टॅरिफ धमक्यांना आणि काँग्रेस पक्षाच्या चिरकूट दबावाला भारत भीक घालणार नाही!!” नरेंद्र मोदीजींनी गर्जना केली. "मला कल्पना आहे की मला व्यक्तिगत स्वरूपात खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, पण त्यासाठी मी तयार आहे. भारतात शेती, पशुपालन, मासेमारी करणाऱ्या लोकांच्या हिताशी मी कोणताही 'समझौता' करणार नाही!"- सगळा खेळ भारताच्या कृषी, पशुपालन-डेअरी आणि मासेमारी क्षेत्रात मोठ्या अमेरिकन गुंतवणुकीसाठी सुरू आहे हे आधीपासून स्पष्ट होते. रशियन तेल आणि एफ- 35 नंतर येतात. 'जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स' भारतावर लादण्याचा अमेरिकन डाव मोदींनी बरोबर ओळखला आहे. स्थानिक बी-बियाणं आणि पारंपरिक पद्धतींवर घाला घालणाऱ्या, शेतकऱ्यांचं बी-बियाण्यावरचं स्वातंत्र्य नष्ट करणाऱ्या, मोठ्या अमेरिकन कंपन्यांच्या पेटंट्समुळे भारतीय शेतकरी कायमचे त्यांना मिंधे राहतील या कुटील करस्थानाला आणि ज्याबद्दल आरोग्यविषयक दीर्घकालीन धोके अजूनही पूर्णपणे स्पष्ट माहीत नसलेली जी एम क्रॉप्स भारतात आणायच्या अमेरिकन व काँग्रेसी षडयंत्राला मोदींनी आज स्पष्ट नकार दिला आहे!
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
रशिया - युक्रेन युद्ध थांबवणाऱ्या पप्पांनी बांगलादेश चे युद्ध थांबवावे - उद्धव ठाकरे.बांगलादेश मध्ये युद्ध सुरू झाले?कधी?कोण लढत आहेत एकमेकांविरुद्ध?आणि पप्पा म्हणजे कोण?भाजपच्या कोणा नेत्यांबद्दल बोलत आहेत का हे की भाजप बद्दलच बोलत आहेत? पण काल परवाच तर हे म्हणाले होते ना की अख्खा भाजप हा एक ढेकूण आहे आणि ते त्याला ढेकणासारखा चिरडून टाकणार आहेत? जर पंतप्रधान मोदींबद्दल बोलत असतील तर यांची स्वतःची च ताकद मोदींपेक्षा जास्त आहे ना?ते स्वतःच तर नुकतेच असे म्हणाले होते की मोदींना महाराष्ट्रात येऊ दे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला.बघा त्यांची गुर्मी कशी उतरवतो ते.जे स्वतः वर वर्णन केल्याप्रमाणे इतके ताकदवान आहेत ते स्वतःच बांगलादेश मध्ये सुरू नसलेले युद्ध थांबवायला का जात नाहीत?युद्ध सुरूच नसल्याने ते थांबवणे एकदम सोपे आहे.तरी हे ते काम दुसऱ्यांना का सांगत आहेत? इथे ढेकूण मारण्यात फार बिझी असल्यामुळे तिकडे बांगलादेशात जाऊ शकत नाही असे काही कारण आहे का?
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ब्राझीलने अमेरिकेच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. आज ब्राझील चे अध्यक्ष लुला इनासिओ डा सिल्वा यांनी ट्रम्पच्या अरेरावीचा विरोध करण्यास ब्रिक्स चा सदस्य या नात्याने ब्राझील तयार असल्याचे जाहीर केले,कारण ट्रम्पने ब्रिक्स देशांवर विशेष ड्युटी लावणार असल्याचे म्हटले आहे. ब्रिक्सचे पाच मुख्य सदस्य आहेत.ब्राझील,रशिया,भारत,चीन आणि दक्षिण आफ्रिका.या शिवाय इजिप्त,इथिओपिया, इराण,सौदी अरेबिया,इंडोनेशिया व यू ए इ या देशांना सुद्धा नंतर सदस्य करून घेण्यात आले आहे.जगाच्या ४९% लोकसंख्येचे आणि ३९% जी डी पी चे हे देश प्रतिनिधित्व करतात.नुकतेच काही आठवड्यांपूर्वी ब्रिक्स देशांचे संमेलन ब्राझील मध्ये झाले होते आणि तेथे अमेरिकन डॉलर चा विनिमयाचे माध्यम म्हणून उपयोग न करता ब्रिक्स सदस्यांचा/ची आपापसात व्यापार व गुंतवणूक कसा/कशी वाढवता येईल यावर विचार करून शिफारशी देण्यासाठी एक समितीही बनवण्यात आली आहे.जागतिक व्यापारावर असलेल्या अमेरिकन डॉलरच्या जबरदस्त वर्चस्वाला त्यामुळे मोठा धक्का बसू शकतो याची जाणीव असल्याने ट्रम्प ने ब्रिक्स सदस्य देशांवर विशेष ड्युटी लावणार असल्याचे जाहीर केले आहे.
🔽
#ModiVsPressure #CentralVistaSavings #IndiaFirst #GMCropsNoThanks #BJPvsCongress #UddhavConfusion #BRICSUnite #DollarDominanceChallenge











Comments