top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Aug 7
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

सध्या निवडणूक तोंडावर आली असल्याने सत्ताधारी पक्ष जो जे वांछिल तो ते लाहो या भूमिकेत आहे. नांदणी इथल्या माधुरी हत्तीणीचे हाल होत आहेत हे बघून सर्वोच्च न्यायालयाने तिला वनतारा मध्ये पाठवा सांगितले परंतु स्थानिकांनी या विरोधात आंदोलन केले हे बघून सरकार तिला परत आणायला निघाले. मुंबईत कबुतरखान्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत म्हणून विधानसभेत चर्चा झाली. न्यायालयाने सांगितले म्हणून कबुतरखाना हटवला गेला. जैन मंडळी , प्राणीप्रेमी संतापले , रस्त्यावर आले. सरकारने तत्काळ घुमजाव केले आणि कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मागे घेतला. समस्त नागरिकांच्या साठी पुढील काही महीने ही सुसंधी आहे. तुम्ही कोणतीही मागणी घेऊन रस्त्यावर या; सरकार तुमचा शब्द झेलायला तयार आहे. फक्त रस्त्यावर खड्डे आहेत, ट्रॅफिक जाम मुळे परेशानी होते आहे. अतिक्रमणांनी हैराण होण्याची वेळ आली आहे, ध्वनी प्रदूषणामुळे त्रास होतो आहे अश्या खर्‍या समस्या घेऊन जाऊ नका.. त्या सोडवल्या जाणार नाहीत.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

डोनाल्ड ट्रंप हे आता जगातील सर्वोत्कृष्ट विनोदवीर सिद्ध होण्याच्या मार्गाला लागले आहेत. त्यांनी भारतावर आधी 25 टक्के नंतर 50 टक्के टेरिफची घोषणा केली. फार्मा उत्पादनांवर तब्बल 250 % टेरिफ लावतो म्हणून धमकावले. यावर भारताच्या परराष्ट्र खात्याने जे सविस्तर आणि मुद्देसूद उत्तर दिले ते म्हणजे अमेरिकेला दिलेली चपराक होती. भारताने आकडेवारी सह यूरोपियन युनियन आणि अमेरिकेचा दुटप्पीपणा उघड केला. भारताला रशियाशी व्यवहार करू नका हा सल्ला देणारी यूरोपियन युनियन आणि अमेरिका भारतापेक्षा जास्त प्रमाणात रशियाशी व्यापार करत असल्याचे भारताने सिद्ध केले. पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्पला विचारलं “अमेरिका रशियाकडून खत, युरेनियम आणि रसायनं आयात करतं का?” या संदर्भात ट्रंप यांनी उत्तर दिले “मला माहिती घ्यावी लागेल , मला याची कल्पना नाही.” तुम्हाला तुमचा देश रशियाशी किती मूल्याचा व्यापार करतो हे माहिती नसेल तर तुम्ही भारताला कोणत्या तोंडांने शहाणपणा शिकवत आहात ??? हा सगळा प्रकार हास्यास्पद आहे. भारतातील एखाद्या महापालिकेचा नगरसेवक सुद्धा पूर्ण माहिती न घेता पत्रकार परिषदेला जात नाही आणि डोनाल्ड ट्रंप पत्रकार परिषदेला सामोरे जाण्यापूर्वी काहीही तयारी करत नाहीत हे खरच खूप गंभीर आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

देवेंद्रजी फडणवीस यांना लोक “मॅनेजमेंट मास्तर” म्हणतात, पण लाडकी बहीण योजनेच्या रूपाने त्यांनी महिलांच्या बाबतीत जे काही केले आहे त्याला माणुसकीचं राजकारण म्हणतात. या संदर्भातील एक हृदय किस्सा.विदर्भातलं एका छोट्याशा गावातलं आभाळभर दारिद्र्यग्रस्त घर. शांता नावाची एक महिला, वय सत्तावीस नवरा मोलमजुरी करणारा, दोन मुलं, आणि घर म्हणजे चार विटा आणि पत्र्याचं छप्पर. सकाळचं पाणी भरायचं, मुलांची भांडणं, नवऱ्याच्या नोकरीची अनिश्चितता, आणि दुपारनंतर गावातल्या शेतावर रोजंदारी. कुठेही स्वतःसाठी क्षण नव्हता. आयुष्य म्हणजे सावकारी कर्जाच हफ्ता… जे उगाच वाढतच चाललेलं. पण गावातल्या इतर महिलांना प्रत्यक्ष पैसे येताना पाहिल्यावर ती आपल्या नावाने अर्ज करून आली. आधार, रेशनकार्ड, बँक पासबुक घेऊन अंगणवाडीच्या कार्यालयात ती उभी होती, आणि एका महिन्याने तिच्या खात्यात 1500 रुपये आले आणि दरमहा मिळणार्‍या या मदतीने तिला नवाच आत्मविश्वास आणि जगण्याची उभारी मिळाली. ही योजना फक्त पैसे देण्यापुरती मर्यादित नाही, ती बाईला ‘लक्षात घेतलं जातंय’ हे जाणवून देणारी आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

इतकी वर्षे कोंग्रेसी स्वतःला अनुकूल असणारे न्यायमूर्ती नेमत असत आणि त्यावेळी त्यांना यात गैर वाटत नसे. तेच भाजपाने केले की आता त्यांना त्रास होतो आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात आला आहे असे वाटू लागले आहे.कारण काय तर आता न्यायाधीशपदावर सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत आहे.खरे तर त्यांनी अशा एकाच नेमणुकीचे उदाहरण दिले आहे आणि त्यावरून असा पक्षपात मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे दाखवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला आहे.सपकाळ यांना शंका वाटत आहे की अशी नेमणूक झालेली व्यक्ती निष्पक्षपणे न्याय देईल का?सपकाळ पुढे म्हणतात की अशी नेमणूक होणे लोकशाहीला अत्यंत घातक आहे. सपकाळ यांनी हे मत व्यक्त करण्याचे कारण असे की ॲड.आरती अरुण साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.ॲड.साठे यांनी यापूर्वी भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या प्रवक्ता पदावर काम केले आहे आणि २०२३ साली भाजपने प्रदेश प्रवक्तेपदावरील व्यक्तींच्या नावाची जी यादी जाहीर केली होती त्या यादीत ॲड.आरती अरुण साठे यांचे नाव आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारताचा विरोधीपक्षनेता राहुल गांधी ही विघ्नसंतोषी व्यक्ती आहे. भारताच्या बाबतीत काहीही वाईट झाले किंवा होणार असेल तर त्याला आनंद होतो. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी म्हणाला होता की आत्ताच लिहून ठेवा,मोदीजी ट्रम्पला शरण जाणार... हे म्हणजे दुसरे तिसरे काहीही नव्हते,जे व्हावे असे राहुल गांधीला वाटत आहे ते त्याने जणू काही भविष्यवाणी वर्तवल्या सारखे बोलून दाखवले होते,इतकेच. खोटारड्या राहुल गांधीच्या शब्दात तेव्हढी ताकद थोडीच आहे की त्याचे शब्द खरे व्हावेत? प्रत्यक्षात काय झाले आहे?तर भारताने अमेरिकेला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की भारत स्वतःच्या हितरक्षणासाठी जे जे आवश्यक ते करत राहील आणि कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही.मोदी एवढ्यावरच थांबले नाही आहेत.ते नजिकच्या काळात दोन दिवसांच्या चीन भेटीला जाणार आहेत आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल रशियाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. ती चर्चा कशाबद्दल असेल याची साधारण कल्पना तरी ट्रम्प चे सल्लागार आणि स्वतः ट्रम्प करतील आणि स्वतःच्या दादागिरीला वेळेतच काही आवर घालतील अशी आपण आशा करूया.

🔽

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page