🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jul 29
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
कळकट साडी नेसली आणि पायात टॉयलेट मध्ये वापरायच्या हवाई स्लिपर घातल्या म्हणून कोणी गरिबांचा मसीहा होत नाही. तीन दशके गरिबांना मूर्ख बनवून सत्तेत राहिलेल्या कम्युनिस्टांना शह देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी आपला असा अवतार करून घेतला आणि गरिबांना वेगळ्या पद्धतीने मूर्ख बनवून सत्ता मिळवली. सत्ता मिळाल्यावर मात्र 'गरिबांचा सत्यानाश करण्यात' ममता बॅनर्जी कम्युनिस्टापेक्षाही नीच निघाली! एकेकाळी देशाचं औद्योगिक हृदयस्थान मानलं जाणारं पश्चिम बंगाल आज उद्योगांच्या दृष्टीने एक पिछडलेलं राज्य बनलं आहे. आधी कम्युनिस्टांनी लाल बावटे नाचवत केलेल्या संप-हरताळीच्या राजकारणातून उद्योगपतींना हुसकावलं आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसने अस्थिर धोरणं, भ्रष्टाचार, खंडणीखोरी आणि गुंडराज यांच्या जोरावर उरलेसुरले उद्योगही बंगालमधून पळवून लावले. 2012 ते 2025 या काळात 6688 कंपन्यांनी पश्चिम बंगाल मधून आपला गाशा गुंडाळला. यापैकी 110 कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड होत्या.पश्चिम बंगालमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्या इतर राज्यांमध्ये स्थलांतर करून जिथे उद्योगविषयक धोरणं सोपी आहेत, उद्योगांना प्रोत्साहन दिलं जातं आणि जिथे गुंडागर्दीला थारा नाही अश्या राज्यांना ते पसंती देत आहेत. सर्वाधिक 1300 कंपन्यांनी महाराष्ट्राची वाट धरली.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
ज्यांची २६/११/२००८ रोजी पाकिस्तानने मुंबईवर आतंकी हल्ला करून शेकडों लोक मारल्यावर आणि जखमी केल्यावर सुद्धा मेणबत्ती मोर्चे काढण्यापलीकडे काही करण्याची हिंमत नव्हती त्या घाबरट काँग्रेसचा खासदार गौरव गोगोई आज लोकसभेत विचारत आहे की पाकव्याप्त कश्मिर ताब्यात न घेता तुम्ही ऑपरेशन सिंदूर का थांबवले?ऑपरेशन सिंदूरच्या नावातूनच ते सुरू करण्याचे कारण स्पष्ट होते.आपण पाकिस्तानच्या पंजाब,खैबर पख्तूनख्वा आणि पाकव्याप्त कश्मिर मधील आतंकी ठिकाणे मोहिमेच्या उद्देशानुसार नष्ट केली.परंतु पाक व्याप्त कश्मिर घेणे हे ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट नव्हते,म्हणून ते घेण्याचा विचारसुद्धा सरकारने व्यक्त केला नव्हता. जे मोहिमेचे उद्दिष्टच नव्हते ते तुमचे उद्दिष्ट का नव्हते हा प्रश्न आता विचारणे निरर्थकच नाही का वाटत?पण काँग्रेसला कोण काय सांगणार? तो पक्ष फक्त टीका करण्यापुरताच अस्तित्वात आहे.एखादी गोष्ट केली तर का केली असे विचारणार,नाही केली तर का नाही केली असे विचारणार.राजकारणात विरोध कसा नसावा याचे काँग्रेसी विरोध हे उत्तम उदाहरण आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
पुण्याच्या ज्या प्रांजल खेवलकरना रेव्ह पार्टीत सहभागी झाल्याबद्दल पुणे पोलिसांनी अटक केली त्यांचा सर्व मराठी टीव्ही चॅनल्स एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर असा उल्लेख करत आहेत.परंतु एकाही चॅनेल ने राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई असा खेवलकर यांचा उल्लेख केलेला नाही.थोडक्यात, शरद पवार यांचे नाव या बदनामीकारक बातमीत अजिबात येणार नाही याची सर्व वाहिन्यांनी मिळून पुरेपूर काळजी घेतलेली दिसत आहे. हेच एकनाथ खडसे जर आज भाजप मध्ये असते तर याच वाहिन्यांनी ही च बातमी भाजप नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर. असे म्हणून पुन्हा पुन्हा ते भाजपचे नेते आहेत हे पुरेपूर घासून,घासून दिली असती या बद्दल किंचित ही शंका नाही.कुणाच्याही सहज लक्षात येईल असेच हे वागणे आहे,पण त्यांना त्याची अजिबात पर्वा नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
शशी थरूर हे केरळ मधील राजघराण्यातील व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे सुसंस्कृत , दिलदार असणे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव आहे. आज संसदेत अधिवेशनादरम्यान एक प्रसंग घडला,काँग्रेसच्या नेत्यांनी शशी थरूर ला चर्चेत भाग घेऊन सरकार वर टीका करा असा मॅसेज दिला,त्यावर शशी थरूर ने ऑपरेशन सिंदूर वरून सरकार वर मी टीका करणार नाही असं स्पष्टपणे सांगितले. त्यावर काँग्रेस नेत्यांनी शशी थरूर यांना तुम्हाला पार्टी लाईन तोडता येणार नसल्याचं सांगितले, त्यावर शशी थरूरने पुन्हा छाती ठोकून काँग्रेस नेत्यांना सांगितले की मी गप्प बसणे पसंत करेन पण संसदेत ऑपरेशन सिंदूर वरून सरकार विरुद्ध बोलणार नाही म्हणजे नाही. शशी थरूर यांनी सिंदूर वरील सर्व चर्चा काँग्रेसचे खासदार म्हणून विरोधी बाकावर बसून ऐकली पण पठ्याने देशाविरुद्ध तोंड उघडलं नाही की ब्र सुद्धा काढला नाही. खर्या राजघराण्यातील सदस्य आणि नकली राजघराणे अर्थात गांधी परिवार यांच्यातील हा फरक लक्षणीय आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
देवेन्द्रजींच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रच एक नंबर आहे! देवेंद्रजी फडणवीस हे ब्रँड ऑफ गुड गव्हर्नन्स आहेत अशी मुक्तकंठाने स्तुति करून मॉर्गन स्टॅन्ली या आंतराष्ट्रीय अमेरिकन वित्तीय संस्थेने महाराष्ट्राच्या अग्रणी असण्यावर शिक्कामोर्तब केले आहे! कोणत्याही राज्याचं आर्थिक सामर्थ्य हे आकड्यांतून मोजलं जातं. पण ते जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रामाणिक अर्थसंस्थांकडून मान्य केलं जातं, तेव्हा त्या यशाला विशेष वजन प्राप्त होतं. अशाच प्रकारे, मॉर्गन स्टॅन्ली या अमेरिकन वित्तीय दिग्गजाने नुकत्याच जाहीर केलेल्या 2024 च्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्राला भारतातील सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून गौरवलं आहे. मॉर्गन स्टॅन्ली ही 1935 पासून आर्थिक नीती ठरवणारी, 70,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची, 40 देशांत काम करणारी, 100 वर्षांजवळची विश्वासार्ह वित्तसंस्था आहे. आणि या संस्थेच्या अभ्यासात महाराष्ट्र नंबर वन ठरतो आणि याचं श्रेय, आकडे आणि वास्तव दोन्ही बघितल्यास, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाला जातं, हे स्पष्ट दिसून येतं.
🔽
#AbhijeetRaneWrites #PoliticalTruths #MamtaBanerjee #CommunistPolitics #CongressHypocrisy #OperationSindoor #MediaBias #DevendraFadnavis #ShashiTharoor #MaharashtraNo1 #MorganStanleyReport





Comments