🖋️ अभिजीत राणे लिहितात
- dhadakkamgarunion0
- Jul 27
- 3 min read
🖋️ अभिजीत राणे लिहितात
मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात एक खूप मोठी घटना घडली भारतातील घराणेशाहीवाल्या पक्षांचे युवराज , 52 वर्षांचे नवयुवक आणि अत्यंत आक्रमक तडजोड न करणारे नेते नाशिकच्या कोर्टात साष्टांग लोटांगण घालून गेले आणि आपला गुलाम मिडिया त्यावर एक शब्द सुद्धा बोलला नाही. घडलेली घटना अशी की राहुल गांधी यांनी भाषणात अनेक वेळा सावरकर यांचा माफीवीर असा उल्लेख केला आणि अत्यंत अपमानास्पद वक्तव्ये केली. त्या विरुद्ध नाशिकच्या न्यायालयात याचिका दाखल झाली होती. राहुल गांधी यांनी कोर्टाची माफी मागून 15000 रुपये रक्कम जमानत म्हणून भरली आणि स्वतःची अटक टाळली आहे. थोडक्यात सावरकरांना माफीवीर म्हणणारा स्वतःच कोर्टाची माफी मागून मोकळा झाला. का ? कारण तुरुंगवासात जाणे हे लोकसभेत मोदींना मिठी मारणे किंवा आपल्या सहकार्यांना डोळ्या मारण्यासारखे सोपे नसते.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आंतरराष्ट्रीय शाखा आहे त्याचे नाव आहे हिंदू स्वयंसेवक संघ. जपानी समाजात हिंदू संस्कार, रीती, संस्कृती आणि मूल्ये यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे.संस्कार, सेवा व संघटन यांच्या माध्यमाने ही संस्था कार्यकर्त्यांची सक्षम यंत्रणा उभारण्यासाठी कसून काम करते. जपानमधील हिंदू समुदायाच्या प्रगतीसाठी ही संघटना प्रयत्नशील आहे.निरंतर कार्यक्रम, कार्यशाळा, सभा व संवाद यांच्या माध्यमातून ही संघटना हिंदूंच्या एकीकरण व सशक्तीकरण यासाठी कार्यरत असते.जातीपातीत विभागलेल्या आणि भाषेच्या अकारण माजापायी आपसांतच कलह करणाऱ्या भारतीय हिंदू समाजाने या अल्पसंख्य पण एकजूट जपानी हिंदू समुदायाकडून व हिंदू स्वयंसेवक संघाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी घाईघाईने जी लाडकी बहीण योजना सरकारने आणली होती तिच्यात प्रचंड प्रमाणात झालेला भ्रष्ट कारभार हळूहळू उघडकीस येत आहे . लाडकी बहीण योजनेचा लाभ 14298 पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .ह्या लाडक्या पुरुषांना ऑगस्ट 2024 पासून आतापर्यंत 21•44 कोटी रुपया वाटप केले गेले . 65 वर्षे वयावरील महिलांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा नियम असूनही तब्बल 2 लाख 87 हजार 803 ज्येष्ठ महिलांनी या योजनेत घुसखोरी केली . त्यांच्या बँक खात्यावर 10 महिन्यात 431 कोटी 70 लाख रुपये जमा केले गेले आहेत . एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा नियम असतांना एकाच कुटुंबात 2 पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची 7 लाख 97 हजार 751 प्रकरणे समोर आली आहेत . त्यांना आतापर्यंत 1196 कोटी 62 लाख रुपये मिळाले आहेत. महाराष्ट्रात सरकारी पातळीवर आंधळे दळत आहे आणि कुत्रे पीठ खात आहे ही परिस्थिती काही केली तरी बदलत नाही.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
काल स्मृती इराणी यांनी आप की अदालत मध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर कसे अन्याय होतात. भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या महिलांवर सार्वजनिक रित्या कसे अत्याचार होतात त्याचा पाढाच वाचला. महिलांच्या केसाला धरून सार्वजनिक ठिकाणी कसे आणले जाते आणि त्यांच्यावर कसे बलात्कार होतात ते सांगितले. पश्चिम बंगालमध्येच नव्हे तर केरळमध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांवर अनन्वित अत्याचार होतात हेही सांगितले. तसेच कम्युनिस्टांचे राजकीय आणि वैचारिक विरोधक असलेल्या सी. सदानंदजी यांचे कम्युनिस्टांनी पाय कापल्याचे सांगून भाजपने त्यांची राज्यपाल नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती केल्याचे सांगितले. पश्चिम बंगाल, केरळ अशा राज्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर, हिंदूंवर अत्याचार होतात हे केंद्र सरकारला माहीत आहे तर अशा राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली जात नाही? मोदी सरकारने खरच आता या दिशेने पावले उचलणे आवश्यक आहे.
🔽
🖋️ अभिजीत राणे लिहितात
भारतात कशाचाही व्यवसाय केला जाऊ शकतो , काहीही विकले जाऊ शकते. गेली काही वर्षे संसदरत्न हा पुरस्कार जाहीर होत असे आणि हा पुरस्कार मिळवणारा खासदार खरोखर कार्यक्षम खासदार आहे असे लोकांना वाटत असे. चिंचवडचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अनेकदा हा पुरस्कार पटकावला होता. आता या पुरस्काराचे बिंग उघड झाले आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन, कुप्पू आर्केड, 6वा मजला, वेंकटनारायण रोड, टी.नगर, चेन्नई 600017 या पत्त्यावर के.श्रीनिवासन भेटतील. के.श्रीनिवासन प्राईम पॉईंट फाउंडेशनचे सर्वेसर्वा आहेत. डिसेंबर 1999 मध्ये ही एनजीओ स्थापन झाली. प्राईम पॉईंट फाउंडेशन हे 'कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट' आहेत असं ते स्वतःला म्हणतात. 'इमेज ऑडिट' नावाची त्यांची एक संकल्पना आहे, ज्याचा वापर करून ते तुमची इमेज चमकवतात. हाच एनजीओ 'संसदरत्न' पुरस्कार देतो. या पुरस्काराचा संसदेशी आणि सरकारशी काडीमात्र संबंध नाही. हा पुरस्कार यांनी स्वतःच बनवलेला आहे! एकदम इन-'हौस' पुरस्कार आहे हा. तुम्हाला पण अशी हौस असेल, तर 'चलो चेन्नई'!!
🔽












Comments