top of page

 अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jul 24
  • 3 min read

 अभिजीत राणे लिहितात

 महाराष्ट्रात येणारा प्रत्येक परप्रांतीय हा स्वभावाने आणि आर्थिक दृष्ट्या गरीब असतो आणि तो कष्ट करून पोट भरायला इथे आलेला असतो हा गैरसमज आहे. ज्या प्रमाणे चित्रपटात काम मिळावे म्हणून अनेक स्वप्नाळू तरुण तरुणी मुंबईची वाट धरतात त्याच प्रमाणे उत्तर प्रदेश बिहार मधील गुन्हेगार मंडळी सुद्धा तिथून तडीपार झाली की गुंडगिरीच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी मुंबईची वाट धरतात. असाच एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा तरुण कल्याण इथे एका दवाखान्यात जातो. डॉक्टर व्यस्त असल्याने रिसेप्शनिस्ट तरुणी त्याला तत्काल आत सोडत नाही हे बघून त्याचा पारा चढतो आणि तो त्या मुलीला मारहाण करतो. हे प्रकरण सोशल मीडियावर पेटते आणि मनसेचे कार्यकर्ते त्या गुंडाला शोधून त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन करतात. या निमित्ताने राज ठाकरे यांची जी जुनी मागणी होती की मुंबईत प्रवेश करणार्‍या प्रत्येक नागरिकाची व्यवस्थित चौकशी करून त्याला प्रवेश दिला जावा ही किती योग्य होती हेच सिद्ध होते आहे.

 अभिजीत राणे लिहितात

 उपराष्ट्रपती धनकड यांनी मोठ्या प्रमाणात औचित्यभंग केल्याचे उघड होते आहे. त्यांनी केवळ सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयास केला नाही तर त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या पदाचा गैरवापर केल्याची प्रकरणे सुद्धा उघडकीला आली आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स भारत दौर्‍यावर आले होते त्यावेळी त्यांनी धनकड यांची काही तास चालेल इतकी दीर्घ भेट घेतली होती. त्यानंतर एका खान्यात त्यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना आदेश दिला की तुमची आणि व्हान्स यांची जी भेट झाली त्यात काय चर्चा झाली याचा वृत्तान्त तुम्ही मला लेखी स्वरुपात पाठवा. वास्तवात पंतप्रधान हेच संपूर्ण मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. त्यामुळे हा सगळं वृत्तान्त उपराष्ट्रपतींनी मागण्याची काहीच गरज नव्हती. या विरोधात जयशंकर यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. पाणी डोक्यावरून जाते आहे हे लक्षात आल्यावर त्यांचा राजीनामा घेतला गेला आणि त्यांना कोणत्याही समारंभाशिवाय आणि गौरवपूर्ण उल्लेख न करता रवाना केले गेले. एका कडवट अध्यायाचा शेवट झाला.

 अभिजीत राणे लिहितात

 महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत खरच खडखडाट झाला आहे का ? कारण गेले कित्येक दिवस कंत्राटदार मंडळींची देयके दिली जात नसल्याच्या तक्रारी ऐकू येत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. सांगलीच्या हर्षल पाटील या तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केलीय. पैशाच्या चणचणीला कंटाळून त्यानं गळफास लावून घेतलाय.त्यानं जलजीवन मिशनचं 1 कोटी 40 लाखाचं काम केलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करुनही बिल मिळत नव्हतं. 65 लाखाचं कर्जही काम पूर्ण करण्यासाठी काढलं होतं. ते वाढत चाललं होतं. त्यामुळे अखेर हर्षलनं आयुष्य संपवलं. राज्यातल्या कंत्राटदारांचे 80 हजार कोटी रुपये थकलेत..कंत्राटदार मंडळी या विरोधात आंदोलन करणार असल्याचे समजते आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी गांभीर्याने घ्यावा असा हा विषय आहे आणि दुर्दैवी बाब म्हणजे विरोधी पक्ष या मुद्द्यावर पावसाळी अधिवेशनात एकही शब्द बोलले नाहीत

 अभिजीत राणे लिहितात

 भारतातील सरकारी कर्मचार्‍यांच्या इतका अंगचोर प्राणी तुम्हाला जगाच्या पाठीवर दूसरा सापडणे अशक्य आहे. कुंडमळा इथे इंद्रायणी नदीवर बांधलेल्या एका जीर्ण पुलावर अपघात झाला आणि त्यात 9-10 माणसे मृत झाली. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम खाते पूलाची मालकी कुणाकडे नावाचा खेळ खेळत स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयास करत आहेत. 1992 मध्ये पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला परंतु जिल्हा परिषदेला हस्तांतर झाले नाही. पूलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हापरिषदेत पारित झाला होता पण मालकीच नसल्याने ते काम झाले नाही. 2004 मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलाचे विस्तारीकरण केले आणि कागदावर जिल्हा परिषदेला हस्तांतरित केले. पण ही प्रक्रिया जिल्हापरिषदेच्या पातळीवर पूर्णच झाली नव्हती. त्यामुळे आता या पूलाची मालकी ना जिल्हा परिषदेकडे होती ना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे. त्यामुळे त्यानंतरच्या सगळ्या तक्रारींना दोन्ही विभागांनी टोलवाटोलवी करत दुर्लक्षित केले आणि ही दुर्दैवी घटना घडली. आता बोला !!!

 अभिजीत राणे लिहितात

रामशास्त्री प्रभूणे यांच्यासारखा निस्पृह न्यायाधीश ज्या भूमीत जन्माला आला त्याच भारतात आजचे न्यायमूर्ती म्हणजे निव्वळ लाज आणणारे प्रकरण होऊन बसले आहे. काल एक राजकीय वक्तव्य केले गेले. सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने राजकीय वक्तव्य करू नये हे सुद्धा त्यांना उमगत नसेल का ? कोलेजियम व्यवस्था कचरा कुंडीत टाकून यू पी एस सी प्रमाणे जजेस च्या नियुक्तीची व्यवस्था निर्माण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय न्यायसंस्थेकडून सामान्य माणसाला असे धक्के बसणे थांबणार नाही. घरात नोटांचे ढीग सापडले तर कोणताही पक्ष असो आपल्या नेत्यावर नाईलाज म्हणून का होईना कारवाई करतो आणि कोणताही नेता माझ्या घरात नोटा सापडल्या म्हणजे त्या माझ्याच आहेत असे सिद्ध होत नाही सारखे निर्लज्ज वक्तव्य करत नाही. ही मंडळी रंगेहात पकडली गेली तरी खुर्चीला चिकटून बसत आहेत आणि त्यांना महाभियोग आणून हाकलावे लागत आहे हे किती दुर्दैवी आहे. आता मोदी सरकार त्या नोटा सापडलेल्या जजला महाभियोग आणून काढणार आहेत यात देशातील करदात्यांचा किती पैसा वाया जाणार आहे ? संसदेचे महत्वाचे तास वाया जाणार आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट न्यायसंस्थेबद्दलचा संपूर्ण आदर सुद्धा संपुष्टात येणार आहे. पण लक्षात कोण घेतो ????

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page