top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jul 23
  • 3 min read

🖋️ अभिजीत राणे लिहितात

भारतातील नागरिक कसे डोके लावतील याची कोणीही कल्पना करू शकत नाही. एखाद्या चांगल्या कायद्याचा पीडित म्हणून कोणी गैरवापर करू लागले तर लोकांना सुद्धा कायद्यातून पळवाट काढण्याची वेळ येतेच. कौटुंबिक हिंसाचार कायदा आणि घटस्फोट कायदा हा हिंदू कुटुंबातील मुलांच्यासाठी डोक्यावरील टांगती तलवार बनला आहे. मुली लग्न करतात. जेमतेम सहा महीने नांदतात आणि नवर्‍याला घटस्फोटाची नोटिस देतात कारण प्रचलित कायद्यानुसार नवर्‍याच्या संपत्तीमध्ये पत्नीला पन्नास टक्के वाटा मिळतो. कायद्यातील ही तरतूद अत्यंत घातक सिद्ध होत होती. यामुळे काही विवाहित तरुणांनी आत्महत्या सुद्धा केली होती. परंतु आता वकील मंडळींनी यात मधला मार्ग शोधून काढला आहे. पालक मुलाच्या लग्नापूर्वी एक ट्रस्ट स्थापन करतात. त्या ट्रस्टचा लाभार्थी त्यांचा मुलगा असतो. मुलाच्या नावावर काहीही मालमत्ता नसते. सगळ्या मालमत्तेचा मालक तो ट्रस्ट असतो. त्यामुळे घटस्फोट झाला तरी मुलाचे नुकसान होत नाही. ट्रस्टची सर्व मालमत्ता लाभार्थी म्हणून त्याच्या कडेच रहाते. फेमीनिजमच्या आहारी जाऊन कायदे बनवणार्‍या सरकारचे यामुळे डोळे उघडतील अशी आशा आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून “महाराष्ट्र नायक” हे पुस्तक आकाराला आले आहे. त्यात देवेन्द्रजींच्या कार्याचा गौरव करणारे ख्यातनाम मंडळींचे लेख आहेत. या पुस्तकात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी देवेन्द्रजींची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. द्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे २०१४ ते २०१९ दरम्यान आम्ही त्यांच्या सोबत होतो. त्यामुळे त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला. नंतरच्या काळात त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची धडपडही जवळून पाहता आली. देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत. शरद पवार म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मला, मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. दोघांनीही आवर्जून त्यांना लवकरात लवकर राष्ट्रीय राजकारणात बघण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे. अर्थात देवेंद्रजी दिल्लीला गेले की या दोघांना इथे मोकळे रान मिळेल अशी त्यांना आशा आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

बिहारच्या निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. बिहारमधील २९.६२ लाख मतदारांनी त्यांनी आयोगाला भरून द्यायचे फॉर्म्स अद्यापही दिलेले नाहीत, ४३.९३ लाख मतदार त्यांनी दिलेल्या पत्त्यांवर आढळलेले नाहीत. या सुमारे ७४ लाख मतदारांच्या तपशीलवार याद्या सर्व राजकीय पक्षांना देण्यात आल्या असून त्यांनी या मतदारांपर्यंत पोहोचून माहिती संकलित करावी जेणेकरून कच्च्या मतदार याद्या बनवणे शक्य होईल. बिहारमधील १२ प्रमुख राजकीय पक्षांना अशी विनंती करण्यात आली आहे की त्यांनी त्यांच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि सुमारे दीड लाख बूथ स्तरावरील प्रमुख कार्यकर्ते यांच्या मदतीने वर उल्लेखलेली आवश्यक माहिती गोळा करून निवडणूक आयोगाला द्यावी म्हणजे एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीमध्ये येण्याचे राहून गेले असे होणार नाही.निवडणूक आयोगा च्या विविध स्तरावरील अधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर या विषयाबाबत बैठका घेतल्या असून १ ऑगस्ट पासून कोणीही नागरिक कच्च्या मतदार याद्यापाहून त्यांत असलेली/ नसलेली नावे तसेच त्यांत करण्यात आलेले बदल यावर त्यांच्या हरकती नोंदवू शकतील. १२,८१७ नवी मतदान केंद्रे उघडण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १२०० पेक्षा अधिक मतदार नाहीत अशी व्यवस्था असलेले बिहार हे देशातील पहिले राज्य असेल.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी का झाली ??? जयंत पाटील तब्बल 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष होते. परंतु या काळात पवारांच्या मुत्सद्देगिरीमुळे मिळालेली सत्ता वगळता जयंतरावांचे स्वतःचे असे कर्तुत्व दिसलेच नाही. अजित दादांनी पक्ष सोडण्याच्या अनेक कारणांच्या पैकी एक कारण जयंतराव आणि त्यांच्यातील टोकाचा संघर्ष हे सुद्धा होतेच. अजित दादा गेल्यावर पक्षातील मरगळ नष्ट करणे ही जयंतरावांची जबाबदारी होती, त्यात ते कमी पडले आणि त्यामुळे विधानसभेला पवार गटाचे पानिपत झाले. जरंडेश्वर साखर कारखान्यासारखी तीन प्रकरणे जयंतरावांनी सांगलीत केली आहेत आणि त्या विरोधात गोपीचंद पडळकर यांनी शड्डू ठोकला आहे. गेले काही वर्ष सातत्याने भाजपाची मनधरणी करूनही भाजपा त्यांना आपल्याकडे घेण्यास तयार नाही. अजित दादा तिकडे गेल्याने तर शक्यताच मावळली आहे. त्यामुळे जयंतरावांच्या डोक्यावर ईडीची टांगती तलवार आहे. थोडक्यात त्यांची उपयुक्तता संपली आहे , आपल्यावर त्यांची निष्ठा नाही हे पण उमगले आहे आणि उद्या ईडी चे प्रकरण चिघळले तर वाचवण्यासाठी जयंतराव आपल्याकडेच धाव घेतील हे लक्षात घेऊन पवारांनी अंग झटकले आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

जनता दल , कोंग्रेस असा प्रवास करून भाजपात आलेले आणि जेष्ठत्व व गुणवत्ता लक्षात घेऊन ज्यांना थेट उपराष्ट्रपती पद दिले गेले होते ते जगदीप धनकड आपल्या मर्यादांचे उल्लंघन करायला लागले होते आणि त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाला त्यांच्यावर दडपण आणून त्यांचा राजीनामा घेण्याची वेळ आलेली आहे असे उघड होत आहे. धनकड यांनी दोन चुका केल्या. पहिली चूक म्हणजे सरकारने यापूर्वी लोकसभेत विरोधकांसह न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्याची रणनीती आखली होती. यामुळेच भाजपने राहुल गांधींच्या स्वाक्षरीसह लोकसभा अध्यक्षांना नोटीस दिली पण,धनखड साहेबांनी लोकसभेशी स्पर्धा करून राज्यसभेत कामकाज सुरू करण्याची तयारी केली, ते कारवाईचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होते. दुसरी घटना म्हणजे सनातन धर्माच्या समर्थनार्थ वक्तव्य करणार्‍या जस्टीस शेखर यादव यांना सर्वोच्च न्यायालय चेतावणी देऊन सोडून देणार होते पण त्याच्यावर सुद्धा महाभियोग आणायच्या विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना धनकड साथ देत होते. त्यामुळे त्यांना हटवणे अपरिहार्य होते. यातून भाजपाचे नेतृत्व धडा घेईल आणि आयातांना डोक्यावर बसवण्याची परंपरा खंडित होईल अशी आशा आहे.

🔽


ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page