top of page

🖋️ अभिजीत राणे लिहितात

  • dhadakkamgarunion0
  • Jul 17
  • 3 min read

Updated: Jul 18

🖋️ अभिजीत राणे लिहितात

डिजिटल क्रांतीत भारताचे नवे सीमोल्लंघन.भारतातील युपीआय ने आता व्हिसा ला मागे टाकत जगातील नंबर 1 रिअल टाईम पेमेंट सिस्टीम होण्याचा बहुमान पटकावला आहे! जून 2025 मध्येच यूपीआय ने ₹24.04 लाख कोटींची उलाढाल केली आणि 18.4 अब्ज व्यवहारांची नोंद केली आहे म्हणजे दररोज सरासरी 650 दशलक्ष (65 कोटी) व्यवहार, जे व्हिसाच्या 639 दशलक्ष व्यवहारांपेक्षा अधिक आहेत. ही केवळ आर्थिक प्रगती नाही, तर डिजिटल भारताच्या नेतृत्वाची जागतिक स्तरावरची पोचपावती आहे. रिक्षावाल्यापासून ते ऑनलाइन शॉपिंगपर्यंत, प्रत्येक भारतीयासाठी सोपा, जलद आणि सुरक्षित पर्याय म्हणजे यूपीआय आहे. नरेंद्र मोदींचे दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आणि त्या नेतृत्वावर असलेला भारतीयांचा विश्वास यामुळेच हे शक्य झालं आहे. युपीआय प्रणाली इतकी सुलभ, चपखल आणि वेगवान आहे की परदेशातील अनेक राजदूत मंत्री सुद्धा त्याच्या प्रेमात पडले आहेत. भुतान, नेपाळ , संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, फ्रांस, श्रीलंका , त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशात ही प्रणाली लागू झाली असून अन्य अनेक देशांशी चर्चा सुरू आहे. भारत डिजिटल क्रांतीद्वारे डॉलरला दणका देतो आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

मांजर शंभर घरे फिरून शेवटी आपल्या मूळ घरी बरोब्बर परत येते तसाच प्रकार भास्कर जाधव यांच्या बाबतीत घडतो आहे. भास्कर जाधव यांनी जेव्हा पहिल्यांदा पक्षांतर केले तेव्हा सारेच त्यांच्यावर तुटून पडले होते पण पुढे अमुक एखाद्या पक्षात जायचे त्याच पक्षात राडा करायचा आणि वैतागून एक दिवस पक्षांतर करायचे त्यांच्या या धरसोड वृत्तीची आता साऱ्यांना सवय झाली आहे त्यातून दुसरी महत्वाची बातमी अशी कि कोकणातले माजी मंत्री आणि गोंधळी पुढारी श्रीमान भास्कर जाधव उद्धव ठाकरेंवर रुसून आहेत उद्धव सेनेला कंटाळले आहेत वैतागले रागावले आहेत. त्यांचा राग वैताग लगेच त्यांच्या तोंडावर दिसून येतो आणि शब्दातून लगेच प्रकट होतो. नेमका हाच प्रकार संयमी भाजपामध्ये खपवून घेतला जात नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा भाजपात प्रवेश करण्याचा प्रयत्न आणि इच्छा राज्यातल्या भाजपा श्रेष्ठींनी अव्हेरली आहे. त्यांना एकनाथ शिंदे गटात त्यांच्या शिवसेनेत जायचे नसल्याने शेवटी ज्या पक्षाने जाधवांना एकेकाळी सत्तेत व संघटनेत फार मोठी संधी उपलब्ध करून दिली होती त्याच पण अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश जवळपास नक्की झाला आहे, उबाठा सेनेला सोडचिठ्ठी देत राम राम ठोकून भास्कर जाधव लवकरच दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेणार आहेत. आता या घरी तरी भास्कर जाधव समाधानाने रहातील अशी आपण आशा करूया.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरळ स्वभावाने मोदीजी आणि अमित शहा यांचे हृदय जिंकून घेतले आहे. त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केलेले भाषण चांगलेच गाजले असून लवकरच शिवसेनेला एक गोड बातमी मिळणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते आहे. खासदार डॉ श्रीकांत शिंदेसाठी पंतप्रधान मोदी वडीलधारे थेट आजोबाच्या वयाचे, कसे का व कुठे मोदीजींना खासदार शिंदे मनापासून आवडले नेमके सांगता येणार नाही त्यातून एक छान वित्तबातमी कानावर आली आहे कि लवकरच केंद्रात विस्तार फेरबल केल्या जाणार आहेत आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदेंना नव्याने मंत्रिमंडळात नक्की स्थान दिले जाणार आहे, डॉ शिंदे लवकरच मंत्री म्हणून शपथ घेतील. मंत्रीमहोदय श्रीकांत शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

‘एक गाव, एक ग्रंथालय’ ही योजना गडचिरोली मध्ये मोठ्या प्रमाणात राबवण्यास सुरुवात झाली आहे. आजपर्यंत 71 गावांमध्ये ग्रंथालये सुरू करण्यात आली असून, 8000 हून अधिक तरुण नियमित वाचनाचा लाभ घेत आहेत. यातूनच 205 तरुण पोलीस दलात भरती झाले आहेत, तर अनेकांनी महसूल व इतर विभागांतही नोकऱ्या मिळवल्या आहेत! चुकीची माहिती देऊन आणि व्यवस्थेविरुद्ध रोष निर्माण करून तरुणांना नक्षलवादी बनवणे ही आजवरची माओवाद्यांची कार्यपद्धती आता त्यांच्यावरच उलटवली जात आहे. गावागावातील ग्रंथालये खरे ज्ञान प्रदान करतील. रोज येणारी वृत्तपत्रे देश विकासाच्या मार्गावर कसा अग्रेसर आहे हे ओरडून सांगत आहेत. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री वारंवार गडचिरोलीला जाऊन तिथल्या छोट्या छोट्या विकास कार्यांचे उद्घाटन करून जनतेशी संपूर्ण शासनाला जोडून घेतो आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे माओवादाचा पराभव आणि स्थानिक जनतेची देशाशी नाळ जोडली जाणे हा आहे. निखिल वागळे सारखे अर्बन नक्षली भुंकण्याचे हेच कारण आहे.

🔽

🖋️ अभिजीत राणे लिहितात

न्यायदेवता आंधळी नाही तर चांगलीच डोळस आहे आणि आरोपींच्या बरोबर तिला सेल्फी काढून घेण्यात काहीही संकोच वाटत नाही. आपल्या न्यायव्यवस्थेचे प्रचंड अधःपतन झालेले आहे. कोंग्रेस पक्षाने 2008 साली सत्तारूढ असताना एक पराक्रम केला आणि त्याची आपल्या देशात योग्य नोंद सुद्धा घेतली गेली नाही. चीन या देशात पीपल्स पार्टी या कायम सत्तारूढ रहाणार्‍या हुकुमशाही पक्षही एक गुप्त करार केला. एक राजकीय पक्ष आणि शत्रू राष्ट्रातील सत्ताधारी हुकुमशाही मंडळी यांच्यात असा करार होणे हीच गोष्ट राष्ट्रहिताला तिलांजली देणारी आहे. पण हे घडले आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कोंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी सातत्याने चीनला मदत होईल अशीच भूमिका स्वीकारली आहे. गलवान इथल्या चकमकीच्या संदर्भाने सैन्याचा अपमान करणारे वक्तव्य राहुल गांधी करतो याला या दृष्टीकोनातून पहायला हवे. ऑपरेशन सिंदूर संबंधित मागितली जाणारी गुप्त माहिती या दृष्टीकोनातून बघितली पाहिजे. परंतु हा विवेक आपल्या न्याययंत्रणेला नाही. आणि राहुल गांधी एखादा राजपुत्र आहे आणि तो आपल्या कोर्टात आला म्हणून केसचे गांभीर्य विसरून त्याच्या बरोबर न्यायमूर्ती महोदय सेल्फी काढून घेत आहेत ही गोष्ट किती गंभीर आहे याचा विचार करा.

🔽

ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page